पाकिस्तानी मॉडेलचे आक्षेपार्ह फोटोशूट : भारताने खडसावले | पुढारी

पाकिस्तानी मॉडेलचे आक्षेपार्ह फोटोशूट : भारताने खडसावले

भारताच्या आक्षेपावर कारवाईची हमी

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानी मॉडेलच्या वादग्रस्त फोटोशूट मुळे शीख समाजात संतापाची भावना आहे. पाकिस्तानात असलेल्या आणि जगभरातील शीख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या करतारपूर गुरुद्वाऱा परिसरात एक पाकिस्तानी मॉडेलने फोटोशूट केले आहे.

यावरून भारताने पाकिस्तानला चांगलेच खडसावले असून पाकिस्तानच्या क्रमांक दोनच्या राजदूताला फैलावर घेतले आहे.
या प्रकरणातील मॉडेल सुलेहा हिने माफी मागितली आहे. या पाकिस्तानी मॉडेलचे फोटोशूट मन्नत या कपड्याच्या ब्रँडसाठी होते.

शीख धर्मीय नाराज

गुरुद्वाऱ्यात जाताना प्रत्येकाने डोके झाकणे आवश्यक असते. पण या मॉडेलने जे फोटोशूट केले त्यात तिने डोक्यावर ओढणी घेतलेली नव्हती. त्यामुळे शीख धर्मियांतून नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला. यावर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाने पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यहार मंत्रायलाला पत्र पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणात सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली. पाकिस्तानमधील पंजाब प्रातांने याची दखल घेत फक्त चौकशीच नाही तर कारवाई देखील करू, अशी हमी दिली आहे. तर या मॉडेलने माफी मागितली आहे.

हेही वाचा 

पाहा व्हिडिओ : मुंबईत भारतातील पहिले पॉड हॉटेल

Back to top button