Hina Khan : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अक्षराला गंभीर आजार, पोस्टमध्ये म्हणाली.. | पुढारी

Hina Khan : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अक्षराला गंभीर आजार, पोस्टमध्ये म्हणाली..

पुढारी ऑनलाईन डेस्क : ये रिश्ता क्या कहलाता है फेम अक्षरा म्हणजेच हिना खान एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. (Hina Khan ) हिना खान सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे. ती आपल्या रोजच्या आयुष्याविषयी अपडेट्सही फॅन्ससोबत शेअर करते. आता हिना खान एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिला झालेल्या आजाराची माहिती तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. (Hina Khan)

हिना खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केली होती. या फोटोमध्ये हिना खानने आपल्या हातात खजूर दिसत आहे.
फोटो शेअर करत तिने आपल्या आजाराबद्दलची माहिती फॅन्सना दिलीय. तिने कॅप्शन शेअर करत लिहिलंय की-“मला गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स (GERD) गंभीर आजार आहे. दुर्भाग्याने रमजानमध्ये ही समस्या आणखी वाढली आहे. जर मी फास्ट कंटीन्यू केले तर माझ्या आईने म्हटलं की, अजवा खजूर मदतशीर ठरु शकते. तुम्ही मला काही घरगुती उपाय सांगू शकाल काय, ज्यामुळे मला आराम मिळू शकेल.”

हिना खानच्या ही पोस्ट पाहिल्यानंतर तिचे फॅन्स चिंतित होत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी तिला सूचना देणे सुरु केले आहे. एका फॅनने लिहिलंय, “इफ्तार नंतर तुम्ही दही-वडा खा, योगार्ट मिळवून, हे तुम्हाला मदतशीर ठरेल.”

दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय, “जिरे पावडर, बडिशेप आणि ओवा पाण्यात मिळवून पूर्ण दिवस प्या”. अन्य एका युजरने लिहिलं, “तुम्ही गर्म पाण्यासोबत बडिशेप खा आणि ॲपल सायडर घ्या.”

Back to top button