HBD Rohit Shetty: ३५ रु. पगार घेऊन मिळवले ३०० कोटी, या विलेनचा मुलगा आहे रोहित शेट्टी | पुढारी

HBD Rohit Shetty: ३५ रु. पगार घेऊन मिळवले ३०० कोटी, या विलेनचा मुलगा आहे रोहित शेट्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड चित्रपटांचे ॲक्शन दिग्दर्शक रोहित शेट्टी यावर्षी आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. (HBD Rohit Shetty) रोहित शेट्टी एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता आहे. (HBD Rohit Shetty) रोहित शेट्टी हिंदी सिनेमातील त्या निवडक दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यांनी कमर्शियल, मास, मेनस्ट्रीम जॉनर सारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त कमाई केली आहे. रोहितसाठी कोटींच्या कमाईचे चित्रपट करणे डाव्या हाताचा खेळ आहे, अशे म्हणायला हरकत नाही. कारण एकेकाळी ३५ रुपये पगार घेणारा रोहित शेट्टी ३०० कोटी कमावतो, ज्यामुळे बॉलिवूडमुळे त्याच्या नावाचा डंका वाजला आहे. (HBD Rohit Shetty)

रोहितचे वडील होते ॲक्शन कोरिओग्राफर

रोहित शेट्टीची आई रत्ना शेट्टी आणि वडील एमबी शेट्टी हे चित्रपटाशी संबंधित होते. रत्ना शेट्टी या बॉलीवूडमध्ये ज्युनियर आर्टिस्ट होती आणि वडील ॲक्शन कोरिओग्राफर आणि स्टंटमॅन होते. रोहितच्या वडिलांनी हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. रोहित यांच्या वडिलांचे खूप कमी वयात निधन झाले होते.

अजय देवगनसोबत डेब्यू

रोहित शेट्टीने वयाच्या १७ व्या वर्षी डेब्यू केलं. आणि एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून एन्ट्री घेतली होती. त्यांने १९९१ मध्ये रिलीज झालेला चित्रपट अजय देवगनचा डेब्यू चित्रपट ‘फूल और कांटे’ मध्ये दिग्दर्शक कुकू कोहली यांचे असिस्टेंट डायरेक्टर होते. १९९४ मध्ये पुन्हा काम केलं. त्यांच्यासोबत ‘कोहिनूर’ ‘सुहाग’, ‘हकीकत’, ‘जुल्मी’ यासारखे चित्रपट केले. याशिवाय, अनीस बज्मी यांच्यासोबत प्यार तो होना ही था, हिन्दुस्तान की कसम, ‘राजू चाचा’ यासारखे चित्रपट केले.

दरम्यान, रोहितने अक्षयसाठी एक बॉडी डबल आणि स्टंट कलाकार म्हणून काम केलं होतं. रोहित शेट्टीने तब्‍बू आणि काजोल यासारख्य़ा अभिनेत्रींसोबत स्‍पॉटबॉय म्हणून देखील काम केलं होतं. त्यावेळी दिग्दर्शक त्यांना दिवसाचे ३५ रुपये पगार द्यायचे. ही त्याची पहिली कमाई होती. पुढे त्याने ३५ रुपयापासून ३०० कोटी कमावले.

रोहित शेट्टीचा डेब्यू चित्रपट

दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीने चित्रपट ‘जमीन’ (२००३) मधून डेब्यू केलं होतं. हा चित्रपट फारसा चालला नाही. रोहितने दुसरा प्रोजेक्ट दिग्दर्शित करण्यापूर्वी तीन वर्षांचा ब्रेक घेतला. रोहित ज‍वळपास ३ वर्षांनंतर गोलमाल चित्रपट घेऊन आले. आणि हा त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला. याशिवाय रोहितने ‘ऑल द बेस्ट’, सिंघम सीरीजचे दोन चित्रपट, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘सिम्बा’, ‘सूर्यवंशी’ यासारखे सुपरहिट चित्रपट बनवले.

३०० कोटींचा मालक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शेट्टी यांची संपत्ती ३०० कोटी रुपये होती. ते प्रत्येक महिन्याला १० कोटींहून अधिक कमाई करतात. ब्रँड एडोर्समेंटसाठी ५ ते ६ कोटी घेतो, चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी मेकिंग टीमकडून १८ ते २० कोटी घेतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

Back to top button