Nayanthara : दुरावा निर्माण झाला म्हणाऱ्याची बोलती केली बंद; नयनताराची पोस्ट चर्चेत | पुढारी

Nayanthara : दुरावा निर्माण झाला म्हणाऱ्याची बोलती केली बंद; नयनताराची पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेत्री नयनतारा ( Nayanthara ) तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नयनतारा आणि तिचा पती विग्नेश शिवन यांच्यात काही तरी खटकले असून त्याच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरवत आहेत. आता तिने या अफवाचे खंडन करून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री नयनताराने ( Nayanthara ) तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केल्याने तिचे खाजगी आयुष्यात कोणतीच अडचण नसल्याचे समोर आलं आहे. यामुळे सोशल मीडियावर पसरलेल्या अफवाच खंडन झाले आहे. नयनतानाने नुकताच इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्यीसोबत आनंदीत कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत नयनतारा, तिचा नवरा विग्नेश शिवन आणि मुले विमानातून एकत्रित प्रवास करताना दिसत आहेत. विमानाच्या सीटवर बसून दोघांनी फोटोला हटके पोज दिली आहे. तर दोघांकडे त्याची लहान दोन मुलेही दिसतात. यावेळी या फॅमिलीच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत आहे.

या फोटोला नयनताराने “माझ्या मुलांसोबत खूप दिवसांनी प्रवास करत आहे.” अशी कॅप्शन लिहिली आहे. याशिवाय तिने पती विग्नेशला टॅग केलं आहे. यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झालेला नसल्याचे चित्र समोर आले आहे. यानंतर सोशल मीडियावर पसरलेल्या अफवाचेह खंडन केलं आहे.

काही दिवसांपूर्वी नयनताराने एक भावनिक पोस्ट केल्याने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण आल्याची माहिती मिळाली होती. या फोस्टमध्ये ती म्हणाली होती की, “माझ्या डोळ्यात अश्रू आले तरी मी हे यश मिळलेन, असे ती नेहमी म्हणत असते.” या पोस्टनंतर नयनतारा आणि विघ्नेश यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले होते.

यानंतर आता तिच्या वरील पोस्टमुळे पुन्हा या अफवांचे खंडन होवून त्याचे वैवाहिक जीवनात सुखी असल्याचे समजते. नयनतारा आणि विघ्नेश दोघांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यानंतर २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. आता दोघेजण जुळ्या मुलांचे पालक आहेत.

Back to top button