पुढारी ऑनलाईन डेस्क : जपानचा खूप लोकप्रिय "ड्रॅगन बॉल" कॉमिक्स आणि एनीमे कार्टूनचे निर्माते, अकीरा तोरियामा ( Akira Toriyama) यांचे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. जपानचा खूप लोकप्रिय "ड्रॅगन बॉल" कॉमिक्स आणि एनीमे कार्टून ची निर्मिती अकीरा तोरियामा यांनी कोली. त्यांच्या प्रोडक्शन टीमने शुक्रवारी याची माहिती दिली.
"ड्रॅगन बॉल" फ्रेंचायजीच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट केले ल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, "आम्हाला हे सांगताना खूप दु:ख होत आहे की, मंगा निर्माता अकीरा तोरियामा यांचे १ मार्च रोजी तीव्र सबड्यूरल हेमेटोमामुळे निधन झाले." तर तोरियामाच्या बर्ड स्टुडियोच्या हवाल्याने जारी केलेल्या स्टेटमेंट मध्ये सांगण्यात आले की, "आम्ही खूप दु:ख होत आहे. त्यांनी खूप उत्साहाने एकत्र अनेक कामे केली."
या स्टेटमेंटमध्ये पुढे सांगण्यात आले आहे की, अकीरा तोरियामाकडे खूप काही गोष्टी असतील. "ड्रॅगन बॉल" आतापर्यंतचा सर्वात अधिक विक्री होणाऱ्या आणि प्रभावशाली कॉमिक्सपैकी एक आहे. पहिल्यांदा १९८४ मध्ये निर्मिती करण्यात आली होती. नंतर एनीमे सीरीज, चित्रपट आणि व्हिडिओ गेमची निर्निती झाली.