Actress Dolly Sohi Death : कुमकुम भाग्य फेम सोही डॉलीचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन

Actress Dolly Sohi
Actress Dolly Sohi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री सोही डॉली सोही हिचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन झाले आहे. डॉली सोहीच्या परिवाराने तिच्या निधनाची माहिती दिली आहे. (Actress Dolly Sohi Death) काही काळापूर्वी सोही परिवारात डॉलीच्या बहिणीचेही निधन झाले होते. (Actress Dolly Sohi Death)

झनक, कुमकुम भाग्य यासारख्या टीव्ही मालिकेतून इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख बनवली होती. अभिनेत्री डॉली सोहीने सर्व्हायकल कॅन्सरशी लढा दिला. आज सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. टीव्ही अभिनेत्री डॉलीच्या परिवारासाठी एक खूप दु:खद घटना आहे. कारण, डॉली सोहीच्या निधनापूर्वी तिची छोटी बहिन अमनदीप सोही कावी‍ळ झाल्याने निधन झाले होते.

डॉली सोहीच्या परिवाराने एका वेबसाईटला सांगितले की, "आमच्या मुलीचे डॉलीचे आज सकाळी निधन झाले. तिचे अचानक जाण्याने आम्ही पूर्णपणे धक्क्यात आहोत. आज तिच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केलं जाईल."

भाभी, कलश, देवो के देव- महादेव यासारख्या टीव्ही शोजमध्ये डॉलीने काम केले होते. सोही मागील काही काळापासून सर्व्हायकल कॅन्सरने ग्रस्त होती. मुंबईतील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते.

डॉली सोहीच्या भावाने सांगितले की, एक दिवस आधी तिची छोटी बहिन अमनदीप सोहीचे निधन झाले होते. ती म्हणाली, "हे सत्य आहे की, अमनदीप या राहिली नाही. तिला कावीळ झाली होती, पण आम्ही त्या मानसिक स्थितीमध्ये नव्हतो की, डॉक्टरांकडून काहीही डिटेल्स घेऊ शकू." डॉली प्रमाणेच तिची छोटी बहिणदेखील अभिनेत्री होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dolly Sohi (@dolly_sohi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Dolly Sohi (@dolly_sohi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Dolly Sohi (@dolly_sohi)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news