आनंद एल. राय यांच्या मधुर ‘रांझना’च्या सुरेली प्रवासाची दहा वर्ष! | पुढारी

आनंद एल. राय यांच्या मधुर 'रांझना'च्या सुरेली प्रवासाची दहा वर्ष!

पुढारी ऑनलाईन : दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी ‘तनु वेड्स मनू’ पासून ते ‘रक्षाबंधन’ या चित्रपटापर्यंत संगीत हा त्याच्या चित्रपटांचा अविभाज्य भाग बनला आहे. सुमधुर गाण्याची अनोखी पर्वणी त्यांच्या चित्रपटातून अनुभवयाला मिळते आणि म्हणून प्रेक्षकांना दिग्दर्शक आनंद एल. राय यांचे चित्रपट कायम भावतात. त्याच्या ‘रांझना’ या सुपरहिट चित्रपट यंदा १० वर्ष पूर्ण करत आहेत. एक दशकाचा प्रवास साजरा करताना आजही या चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

महान संगीतकार ए.आर. रहमान आणि प्रख्यात गीतकार इरशाद कामिल यांचा साउंडट्रॅक या चित्रपटातून गाजला. आनंद एल. राय आणि ए. आर. रहमान यांचा हा पहिला चित्रपट होता. ‘रांझना’, ‘बनारसिया’, ‘पिया मिलेंगे’, ‘तुम तक’, ‘और ऐसे ना देखो’ या गाण्यांची चर्चा आजही तितकीच आहे. या गाण्याचा अनोखा प्रेक्षक वर्ग आहे. अलीकडेच सोशल मीडिया वर ‘रांझना’ हे गाणं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसलं आहे.

या चित्रपटातून धनुषने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि ते तितक अविस्मरणीय ठरलं. सोनम कपूरसोबतची धनुषची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. रांझना हा चित्रपट दहा वर्षापूर्वी देखील तितकाच सुपरहिट होता. आत्तापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी हा चित्रपट मानला जातो.

‘रांझना’ हा एक चित्रपट नसून अनेकांच्या भावनाना कनेक्ट करणारा चित्रपट ठरला. प्रेम कहाणीच्या पलिकडे जाऊन या चित्रपटाने अनेक गोष्टीने प्रेक्षकांची मन जिंकली. दमदार कथा आणि अनोख्या गाण्याची पर्वणी असणारा हा खास चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

हेही वाचा : 

Back to top button