Rajkummar Rao : राजकुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणखी एक पुरस्कार

rajkumar rao
rajkumar rao

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाचं वर्ष अभिनेता राजकुमार राव याच्यासाठी खास मानलं जातंय आणि त्याचं कारण देखील तितकच खास आहे. त्याच्या चमकदार कामगिरीसह २०२३ मध्ये त्याला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. (Rajkumar Rao) अनेक पुरस्कारांच्या सोबतीने 'मोनिका ओ माय डार्लिंगमधील' अभिनयासाठी बी-टाऊनच्या शेपशिफ्टरने डिजिटल फिल्ममध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (ज्युरी) पुरस्कार जिंकला. अभिनयात कोणतीही कसर न सोडता उत्तम कथा आणि आणखी कमालीच्या भूमिकावर हा राजकुमार काम करताना दिसतोय. (Rajkumar Rao)

राजकुमार याने अलीकडेच त्याच्या बहुप्रतीक्षित स्त्री-२ च्या रिलीजची तारीख त्यांच्या टीमसोबत जाहीर केली. २०२३ मध्ये राजकुमार राव मिस्टर आणि मिसेस माही, गन्स आणि गुलाब आणि श्रीकांत बोल्ला यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news