Karan Deol Wedding : करणच्या लग्नाची जोरदार तयारी; ‘रोका सेरेमनी’त तिन्ही देओल ब्रदर्स एकत्र | पुढारी

Karan Deol Wedding : करणच्या लग्नाची जोरदार तयारी; 'रोका सेरेमनी'त तिन्ही देओल ब्रदर्स एकत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल (Karan Deol) त्याची लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड दृशा आचार्य (Drisha Acharya) हिच्याशी लवकरच लग्न करणार आहे. हा लग्न सोहळा १६ ते १८ रोजी मोठ्या धुमधडाक्यात पार पडणार आहे. यामुळे लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली असून एक- एक विधी पार पडत आहे. नुकताच देओल कुटूंबियामध्ये रोका सेरेमनीचा कार्यक्रम पार पडला आहे. दरम्यान या विवाहातील ( Karan Deol Wedding ) अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, करण आणि दृशाच्या खऱ्या अर्थाने १६ तारखेपासून साखरपुडा, हळद, मेंहदी आणि लग्न सोहळ्यातील ( Karan Deol Wedding ) अनेक विधी पार पडणार आहे. यासाठी करणच्या बंगल्याला खास लायटिंगचे डेकोरेशन करण्यात आले आहे. दरम्यान काल १२ जूनला रोको सेरेमनी सोहळा पार पडला आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल, सनी देओल आणि अभय देओल तिघेजण एकत्रित स्पॉट झाले. या वेळचा एक व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामव व्हायरल झाला आहे. तर १८ जून रोजी मुंबईतील ताज लँड अॅन्ड येथे करण आणि दृशाच्या लग्नाचे रिसेप्शन पार्टीचे आयोजन केल्याचीही माहिती मिळाली आहे.

याशिवाय या लग्नासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. रोको सेरेमनी सोहळा काही मोजक्यात मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी या कपलला भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

बॉबी, सनी आणि अभय देओलच्या व्हिडिओवर चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय. दरम्यान एका युजर्सने ‘बॉक्स ऑफिस पर क्लॅश’, ‘बाबा निराला पाश्चिमात्य कपड्यात’. तर दुसऱ्या एका युजर्सने ‘या आनंदाच्या प्रसंगी तिन्ही भावांना एकत्र पाहून खूप आनंद झाला’ असल्याचे म्हटलं आहे. या व्हिडिओवर आतापर्यत २६ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स आणि कॉमेन्टस केल्या आहेत.

हेही वाचा : 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by karan deol.fc actor (@imkarandeol7)

Back to top button