aparshakti khurana
aparshakti khurana

Aparshakti Khurana : अपारशक्तीच्या झोळीत स्त्री २, फायडिंग रामसह अनेक चित्रपट

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॉवरपॅक परफॉर्मर अशी अनोखी ओळख जपणारा अपारशक्ती खुराना सध्या चर्चेत आहे. (Aparshakti Khurana) वेगवेगळ्या भूमिकांमधून नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकून घेत अभिनेता अपारशक्ती खुराना चर्चेचा विषय ठरतो. प्रतिभावान अभिनेता तर तो आहेच. पण चित्रपटाच्या सोबतीने अपारशक्ती खुराना त्याच्या नव्या वेबसीरीज ज्युबिलीमध्ये अगदीच चमकला आहे. अपारशक्ती खुराना स्त्री, लुका छुप्पी आणि पती, पत्नी आणि वो सारख्या हिट चित्रपटांचा अविभाज्य भाग ठरला आहे. (Aparshakti Khurana)

१९४० च्या दशकात सुपरस्टार मदन कुमारची भूमिका त्याने साकारली होती. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील जुबली या त्याच्या नव्या सीरिजमधील भूमिकेसाठी अपारशक्तीचे कौतुक होत आहे. अपारशक्तीने त्याच्या या रोलसाठी मेहनत घेऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्याच्या या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी काय यांनी काय सांगितले ते बघूया.

एका चाहत्याने ट्विट केले की, "ज्युबिलीमधील त्याच्या भूमिकेत अपारशक्ती खुराना चमकत आहे, हे दाखवून देतो की तो केवळ कॉमिक अभिनेता नाही. आपल्या कामगिरीने तो कोणत्याही भूमिकेला कौशल्याने आणि चोखपणे हाताळू शकतो हे त्याने सिद्ध केले आहे. #JubleeOnPrime"

दुसर्‍या चाहत्याने लिहिले, "ज्युबिलीमध्ये अपारशक्ती खुराणाने एक उत्तम अभिनेता म्हणून आपली क्षमता सिद्ध केली. #JubleeOnPrime."

अपारशक्ती त्याच्या कारकिर्दीतील एका सर्वोत्तम टप्प्यात आहे. आपार शक्तीकडे बर्लिन, ज्युबिलीचे लेखक अतुल सबरवाल यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले, फायडिंग राम आणि स्त्री – २ आणि असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news