Urfi Javed : गुलाबी आँखे नव्हे, गुलाबी ड्रेस! | पुढारी

Urfi Javed : गुलाबी आँखे नव्हे, गुलाबी ड्रेस!

पुढारी ऑनलाईन : फॅशनच्या दुनियेत एकापेक्षा एक धमाल उडवून देणार्‍या ऊर्फी जावेदला आता सर्वदूर ओळखले जाते. फॅशनच्या विश्वात तिने स्वत:ची विशेष ओळख प्रस्थापित केली आहे. अर्थात, हीच ऊर्फी काही असेही अनोखे, थक्क करायला लावणारे प्रकार करते, ज्यामुळे हीच खरी फॅशन आहे का, असा प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाही.

मुळात, ऊर्फीच्या दिवसाची सुरुवातच आधी सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेल्या अनोख्या फोटोंमुळे होते. तिचा लूक, तिचे कपडे आवडो न आवडो; पण तिच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही, हीच आता वस्तुस्थिती ठरत आहे.

ऊर्फीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सध्याच आणखी बोल्ड छायाचित्र पोस्ट केले असून यात कॅमेर्‍यासमोर ती टॉपलेस आली. यात तिने आपले अंग केवळ गुलाबाच्या पाकळ्यांनी झाकले होते. आता ऊर्फीच्या या बोल्ड छायाचित्रावर विविध प्रतिक्रिया येणार, हे साहजिकच होते. एका यूझरने तिला थेट विचारले, याची तरी काय गरज होती?.

Back to top button