The Kerala Story वर सुप्रीम कोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी | पुढारी

The Kerala Story वर सुप्रीम कोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘द केरला स्टोरी’ (the kerala story) चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्यास केरळ उच्च न्यायालयाने अंतरिम मनाई केली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायायात अपील दाखल झाले असून त्यावर 15 तारखेला सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

केरळ, तामिळनाडू तसेच प. बंगालमध्ये ‘द केरला स्टोरी’ (the kerala story) चित्रपटाला विरोध केला जात आहे. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे. चित्रपटात विशेष समुदायाविरोधात आक्षेपार्ह असे काहीही नाही, अशी टिप्पणी करीत केरळ उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्यास नकार दिला होता. केरळमध्ये हिंदू महिलांना लव्ह जिहादमध्ये फसवून त्यांना इसिसच्या दहशतवादी कृत्यांमध्ये सामील करण्यासाठी विदेशात पाठविले जाते, असे या चित्रपटाचे कथानक आहे.

दरम्यान, बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करीत असलेल्या या चित्रपटावर प. बंगालच्या तृणमूल सरकारने बंदी घातली आहे. सोमवारी (दि. 8) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत आदेश दिले. (the kerala story)

Back to top button