प्रियांका चोप्रा कुणाला म्हणाली बॉलीवूडची पुढील सुपरस्टार ? | पुढारी

प्रियांका चोप्रा कुणाला म्हणाली बॉलीवूडची पुढील सुपरस्टार ?

पुढारी ऑनलाईन : मला अलाया फर्निचरवाला खूप आवडते. ती पूजा बेदी यांची मुलगी आहे. अलाया खूप मस्त आहे. तिची विचार करण्याची पद्धतही वेगळी आहे. तिला इतर अभिनेत्रींसारखे अजिबात व्हायचं नाही. त्यामुळे ती बॉलीवूडची आगामी काळातील सुपरस्टार असू शकते, असे मला वाटते, अशी स्तुती प्रियांका चोप्राने केली आहे.

बॉलीवूडसह हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. नुकतेच प्रियांका चोप्राने बॉलीवूडची पुढची सुपरस्टार कोण असेल, असे विचारल्यावार अलाया फर्निचरवालाचे नाव घेतले. प्रियांका चोप्रा ही सिटाडेल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत प्रियांका ही बॉलीवूड अभिनेत्रींबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी प्रियांकाला बॉलीवूडची आगामी काळातील सुपरस्टार कोण असेल असे विचारण्यात आले. यावेळी तिने अलायाचे नाव घेतले. ती पुढे म्हणाली, अलायाबाबत मी बरोबर आहे की नाही, हे येत्या काही वर्षांत कळेल. प्रियांका चोप्राच्या उत्तराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी त्यावर विविध कमेंट करत प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आता प्रियांकाने अलायाचे नाव घेतलं आहे, त्यामुळे आता तरी तिला चांगले चित्रपट मिळतील अशी आशा आहे.

Back to top button