मराठी कलाकार अहंकारी नसतात! | पुढारी

मराठी कलाकार अहंकारी नसतात!

रोहित शेट्टी बॉलीवूडमधील एक दिग्गज दिग्दर्शक आहे. आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या चित्रपटांत अनेक मराठी कलाकार पाहायला मिळतात. त्याच्या सर्कस चित्रपटात सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर आणि अश्विनी काळसेकर या मराठी कलाकारांनी काम केले होते. रोहितने नुकतेच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने मराठी कलाकारांना संधी देण्यामागचे कारण सांगितले होते. मराठी कलाकार हे साधे आणि प्रतिभावान आहेत. ते अहंकारी नसतात. उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे अनेक कलाकार आहेत. पण मराठी कलाकार कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेत काम करतात, असे म्हणत रोहित शेट्टीने मराठी कलाकारांचे कौतुक केले होते.

Back to top button