सुपरस्टार प्रभासचा २५ वा चित्रपट येणार भेटीला | पुढारी

सुपरस्टार प्रभासचा २५ वा चित्रपट येणार भेटीला

पुढारी ऑनलाईन :

सुपरस्टार प्रभास दरवर्षी काही नवे घेऊन येत असतो. आता पुन्हा एकदा त्याने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. तो आपल्या
२५ व्या चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Prabhas
प्रभास आणतोय नवा चित्रपट

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सुपरस्टार प्रभास  याचा २५ वा चित्रपट अद्भुत असेल. सुपरस्टार लवकरच एक विशेष घोषणा करणार आहे. चित्रपटाविषयीची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. या चित्रपटाचे कथा त्याच्या आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत पूर्णत: वेगळी आहे.

चित्रपटात प्रभास आधी कधीही न दिसलेल्या भूमिकेत दिसणार आहे. तो ब्लॉकबस्टर अशा दिग्दर्शकासोबत काम करत आहे. बाहुबली चित्रपट सुपरहिट ठरल्‍यानंतर भारतीय सुपरस्टार प्रभास घराघरांत पोहोचला.

जगभरातील प्रभासचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. ७ ऑक्टोबर, २०२१ ला त्याच्या २५ व्या चित्रपटाची घोषणा हाेणार आहे.

हेही वाचलं का?

Back to top button