सोमनाथ अवघडे : ‘फँड्री’तल्या जब्याचा मेकओव्हर

सोमनाथ अवघडेचा मेकओव्हर झालाय
सोमनाथ अवघडेचा मेकओव्हर झालाय
Published on
Updated on

प्रेम मिळवण्यासाठी रानावनातून काळी चिमणी शोधणारा जब्या सर्वांना आठवतो. फँड्रीमध्ये अगदी साधा जब्या सर्वांच्याच पसंतीस उतरला. या चित्रपटानंतर तो फारसा लाईमलाईटमध्ये राहिला नाही. जब्या अर्थातचं सोमनाथ अवघडे याचा नवा चित्रपट येतोय. सोमनाथ अवघडे याचा मेकओव्हर पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

फँड्रीनंतर त्याने कुठलाचं चित्रपट केला नाही. 'फँड्री' तील उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे आमीर खानलाही जब्याच्या अभिनयाची भूरळ पडली होती. आमीरने त्याची भेटही घेतली. पण, त्यानंतर तो प्रकाशझोतात आला नाही. आता मात्र तो नव्या चित्रपटात दिसणार आहे.

जब्याचा मेकओव्हर

१४ फेब्रुवारी २०१४ रोजी जब्याचा फँड्री हा चित्रपट रिलीज झाला होता. इतक्या वर्षात जब्याचा जो मेकओव्हर झालाय, ते पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. तो खूप बदललेला आहे. त्याचा डॅशिंग लूक समोर आलाय. जब्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचा फोटो पाहायला मिळतोय. या लूकमध्ये जब्या खूप डॅशिंग दिसतोय. त्याने आपल्या लूकवर खूप मेहनत घेतल्याचं दिसतयं. जब्याची नवीन स्टाईल स्टेटमेंट रसिकांनाही आवडलीय. त्याच्या फॅन्सकडून यावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरू आहे.

आता जब्या नव्या चित्रपटात काय जादू दाखवतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

सोमनाथ अवघडेचा मेकओव्हर झालाय
सोमनाथ अवघडेचा मेकओव्हर झालाय

फ्री हिट दणका जब्याचा नवा चित्रपट

'फ्री हिट दणका' असे जब्याच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले. हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुनील मगरे यांनी 'फ्री हिट दणका' चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात फँड्री' फेम सोमनाथसोबत अपूर्व एस. असणार आहे. सोबत 'सैराट' चित्रपटातील जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची आहे. लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत. नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.

हेही वाचलं का ?

 

View this post on Instagram

 

A post shared by Akash Gaikwad (@akash_g_8055)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news