Aishwarya : ऐश्वर्या रायच्या ‘त्‍या’ फ्‍लाईंग किसने चाहते घायाळ | पुढारी

Aishwarya : ऐश्वर्या रायच्या 'त्‍या' फ्‍लाईंग किसने चाहते घायाळ

नवी दिल्‍ली ; पुढारी वृत्‍तसेवा : अभिनेत्री ऐश्वर्या राय ( Aishwarya  ) नुकतीच पॅरिस फॅशन वीक मध्ये रॅम्‍प वॉक करताना दिसून आली. त्‍यावर चाहत्‍यांसह अनेक कलाकारांनी देखील तिची स्‍तुती केली आहे. तीच्या पांढऱ्या रंगाच्या गाउनमधील लूकचीही जोरदार चर्चा झाली.

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या

ऐश्वर्या राय ( Aishwarya) गेल्‍या काही दिवसांपासून तिच्या लेटेस्‍ट फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत आहे. ऐश्वर्याने आपल्‍या अभिनयासोबतच सुंदरतेनेही तिच्या चाहत्‍यांना भुरळ घातली आहे.  ऐश्वर्या राय हिचे  काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुरळा उडवत आहेत. ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीक मध्ये रॅम्‍पवॉक करताना दिसून आली. पहिला तिच्या पांढऱ्या शुभ्र गाउनची चांगलीच चर्चा झाली. तर आता तिच्या निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटोंना चांगली पसंती मिळत आहे.

स्‍टेज वरून चाहत्‍यांना दिला फ्लाईंग किस…

सध्‍या ऐश्वर्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्‍यामध्ये ती रॅम्‍प वॉक करताना चाहत्‍यांना फ्लाईंग किस देताना दिसून येत आहे. ऐश्वर्याने निळ्या रंगाचा डिझायनर आउटफिट परिधार केला आहे. तिने बॉटम जीन्स त्‍यावर निळ्या रंगाचा डिझायनर आउटफिट खुले सोडलेले केस, अशा अंदाजात जेंव्हा रॅम्‍पवॉक करायला सुरूवात केली तेंव्हा चाहत्‍यांनी टाळ्यांचा कडकडाटात तिचे स्‍वागत केले.

परदेशी तारकांसोबत पोज देताना ऐश्वर्या …

पॅरिस फॅशन वीक मध्ये ऐश्वर्या राय ऐश्वर्या ही लीला बेखती (Leila Bekhti), हेलेन मिरेन (Helen Mirren) यांच्या सोबत पोज देताना दिसून आली. सध्या ती तिच्या आगामी तमिळ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती ‘Ponniyin Selvan’ मध्ये दिसणार आहे. या सोबतच ती अनुराग कश्यप च्या ‘गुलाब जामुन’ या चित्रपटातही दिसणार आहे. शेवटी ती ‘फन्ने खान’ मध्ये दिसली होती.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button