R. Madhavan : शर्मन म्हणतो, भावा, सुपर दिसतोयस ! | पुढारी

R. Madhavan : शर्मन म्हणतो, भावा, सुपर दिसतोयस !

पुढारी ऑनलाईन : प्रतिभावंत अभिनेता आर. माधवन आता ५२ वर्षाचा आहे. तरीही त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. माधवन सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. तो सोशल मीडियावर स्वतःचा एखादा फोटो किंवा सेल्फी पोस्ट करतो, त्यावेळी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. माधवन सध्या त्याच्या एका नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे आणि या प्रोजेक्टचा त्याने नवा लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

अखेर नव्या प्रोजेक्टसाठी नवा लूक, खूप उत्सुक आहे, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. त्याचा नवीन लूक पाहून तरुणी पुन्हा त्याच्यावर फिदा झाल्या आहेत. विशेष म्हणजे काहींनी त्याला हा फोटो डिलिट करण्याची विनंती केली आहे. ‘माझी पत्नी तुमच्याकडे पाहत आहे. सर, कृपया फोटो डिलिट करा. ‘ असे एकाने, तर नव्या प्रोजेक्टमध्ये तू पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असणार, असा अंदाज दुसऱ्या युजरने लावला आहे.

‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात माधवनच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता शर्मन जोशीसुद्धा कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. त्याने, ‘भावा, सुपर दिसत आहेस.’ असे म्हटले आहे!

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

Back to top button