Aditi Rao Hydari : मला काहीच फरक पडत नाही! | पुढारी

Aditi Rao Hydari : मला काहीच फरक पडत नाही!

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री आदिती राव हैदरी प्रतिभाशाली अभिनेत्री आहे. तिने हिंदीसह तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्यांनी आदितीच्या प्रतिभेचा चांगला वापर केल्याची गेले काही दिवस चर्चा होती. त्यावर आदितीने भाष्य केले आहे.

‘अशातच आपल्याला हिंदी चित्रपट निर्मात्यांकडून जास्त ऑफर न मिळाल्याबद्दल काळजी वाटत नाही,’ असे आदितीने म्हटले आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली, ‘मी हे खूपदा ऐकले आहे! हिंदी चित्रपट निर्माते मला दाक्षिणात्य निर्मात्यांप्रमाणे रोमांचक भूमिका देत नाहीत; पण याचा मला फारसा फरक पडत नाही. मी अनेक लोकांना पाहिले आहे की, ज्यांनी इंडस्ट्रीत खूप चांगले काम केले आहे.

जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा लहान मुलगी म्हणून माझे स्वप्न मणिरत्नम यांच्या चित्रपटातील हिरॉईन होण्याचे होते. मला माहीत होते की, मला तमिळ बोलावे लागेल कारण ती त्यांची भाषा आहे आणि एक तमिळ चित्रपट बनवताना त्यांना खूप आनंद होईल. खरं तर मी अशा कुटुंबातून आले आहे, जिथे माझी आई, आजी सर्व उत्तम कथाकार आहेत. मोठं होताना मला समजलं की भाषा, जात, धर्म, काहीही कथेच्या आड येत नाही.’

Back to top button