टास्कमध्ये तू जे माझ्यावर टाकलसं ना ते अजूनही आठवतंय : सुरेखा कुडची | पुढारी

टास्कमध्ये तू जे माझ्यावर टाकलसं ना ते अजूनही आठवतंय : सुरेखा कुडची

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठी कार्यक्रम आणि त्यामधील वेगवेगळे टास्क यांची चर्चा रंगतेय. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणर आहे. “खुलजा सिमसिम” हे कॅप्टन्सी कार्य. या टास्कसाठी टीम A मधील सदस्यांनी जय आणि गायत्री या दोन उमेदवारांची नावे दिली आहेत. दरम्यान, आज जय सुरेखा कुडची यांची मनधरणी करताना दिसेल. जय सुरेखा कुडची यांनी म्हणतो, बघा मी कचरा नाही टाकला. त्यावर त्या म्हणाल्या, ‘तू जे टाकलं आहेस ना ते मला पुढचे चार दिवस आठवत आहे.’

डेव्हिड वॉर्नर – हैदराबाद दरी वाढली; संघासोबत प्रवास करण्यास मज्जाव?

रानू मंडल हिने टी-शर्ट घालून गायिले ‘मनिके मागे हिथे’ गाणे

या टास्कसाठी देखील सदस्य तितक्याच मेहनतीने लढत देणार यात काहीच शंका नाही. पण, ती हिंदीमध्ये कहावत आहे ना, “अब आया ऊँट पहाड़ के नीचे” तशी गत होणार आहे.

Mitali Mayekar : शेअर करायला गेली व्हिडिओ आणि झाली ट्रोल

Air India : एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडेच!!!

 

हल्लाबोल या टास्कसाठी दोन्ही टीममधल्या सदस्यांनी एकमेकांना खडेबोल सुनावले. जय आणि गायत्रीने टीम B मधून आलेल्या दोन्ही जोड्यांना मोटार बाईकवरून उठवण्यासाठी बरीच मेहनत घेतली. खूप काही ऐकवले.

कुंटणखान्यावर एमआयडीसी पोलिसांचा छापा, तिघांना अटक

सिंधुदूर्ग : नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार?

आज जय आणि गायत्रीला कॅप्टन बनण्यासाठी याच सदस्यांच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. तो पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना घरातील सदस्यांना पटवून द्यायचे आहे. ते उत्तम कॅप्टन कसे आहेत आणि इतर सदस्यांनी त्यांना त्यांचे मत का द्यावं. हे पटवून देण्यासाठी त्यांना परिश्रम करावे लागतील. अत्यंत कठीण दिसणारा हा टास्क कसे सदस्य पार पाडतील? कोण बनेल घराचा नवा कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

जय करणार मनधरणी

जय आज सुरेखाताईंना मनवताना दिसणार आहे. जय ताई ताई करत त्यांना विनंती करताना दिसणार आहे. त्यावर सुरेखाताई म्हाणल्या, “अच्छा ताई ? मध्ये काय काय झालं आहे माहिती आहे ना ? मला विचार करू दे… पहिली दुश्मन आहे मला सॉरी म्हणून माझ्या आंगावर कचरा टाकणारी. गायत्री त्यावर म्हणली बघाना ताई मी किती गोड आहे… जयने पण संधी साधली बघा मी कचरा नाही टाकला.

त्यावर सुरेखाताई म्हणाल्या, तू जे टाकलं आहेस ना ते मला पुढचे चार दिवस आठवत आहे. मी विचार करते थोडा. ते तुमच्यात काय करतात ना “डील” काय असेल डील ? मला आवडलं हे खूप डील. तू जर जिंकलास तर तुझे अर्धे पैसे मला देशील”. बघूया सुरेखाताईंचे मत कोणाला मिळणार ?

तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

औरंगाबाद : सिल्‍लोडात पावसामुळे दाणादाण, शेतीच गेली खरडून

Chennai Super Kings : सीएसकेचा पहिला नंबर; १२ हंगामात ११ वेळा साखळीत पास

देवेंद्र फडणवीस : सरकारकडून फक्त घोषणाच, मराठवाड्याला मदत नाहीच

 

View this post on Instagram

 

A post shared by Surekha Kudachi (@surekha.kudachi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Surekha Kudachi (@surekha.kudachi)

Back to top button