कुंटणखान्यावर एमआयडीसी पोलिसांचा छापा, तिघांना अटक | पुढारी

कुंटणखान्यावर एमआयडीसी पोलिसांचा छापा, तिघांना अटक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: अजिंठा चौकाजवळील एक भागात असणाऱ्या उच्चभ्रू वस्तीत भाड्याच्या घरात सुरू असलेल्या कुटंणखान्यावर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि. ३०) रोजी रात्री ८ वाजता छापा टाकला. या ठिकाणाहून एक महिला व दोन दलालांना ताब्यात घेण्यात आले. तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

अमोन आदिनाथ दारकुंडे (वय २९, रा. क्रांतीचौक, शिवाजीनगर) व प्रशांत रतन जैन (वय ३१, रा. अयोध्यानगर, अजिंठा हौसिंग सोसायटी) असे अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. त्यांच्यासह एका महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत महिती अशी की, अजिंठा चौफुलीजवळील एका घरात महिला भाड्याने राहत होती. महिलेने या घरात कुटंणखाना सुरू केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफार तडवी, सुनिल सोनार, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, नीलेश पाटील, महेश महाले, रवींद्र मोतीराया यांच्या पथकाने गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक बनावट ग्राहकाच्या माध्यमातून कुंटनखान्यावर छापा टाकला.

यावेळी तेथे तीन पिडीत महिला मिळून आल्या. त्यांची सुटका करण्यात आली. तर अमोन आदिनाथ दारकुंडे व प्रशांत रतन जैन यांच्यासह एका महिलेस ताब्यात घेऊन कारवाई केली. या घटनेत तिघांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button