Rakhi Sawant : ‘ही आमची संस्कृती आहे का?’; राखी सावंत ट्रोल | पुढारी

Rakhi Sawant : 'ही आमची संस्कृती आहे का?'; राखी सावंत ट्रोल

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती आपल्या फिरंगी मित्र आणि हॉलिवूड स्टार्स सोबत दिसत आहे. यातील तिचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

राखीच्या फोटोवर एका नेटकऱ्याने, ‘तू हॉलिवूड स्टार्सपेक्षा खूप सुंदर दिसतेस,’ असे म्हटले आहे. तर एकाने, तू त्यांच्यासमोर लहान मुलगी वाटत असल्याची कमेंट केली आहे. तर एकाने ‘ही काय आमची संस्कृती आहे का?’ असा सवाल राखीला केला आहे.

राखीने (Rakhi Sawant) जे फोटो शेअर केलेत ते कोणत्या इव्हेंटचे आहेत हे तिने सांगितलेले नाही. या फोटोत राखीसह सर्व स्टार्स ग्लॅमरस दिसत आहेत. त्यांची पोज आणि ॲक्शन हॉलिवूडच्या इव्हेंट प्रमाणे दिसून येत आहे.

याआधीही राखीने आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. त्यात ती पार्टी मूडमध्ये दिसून आली होती. हे फोटो शेअर करत तिने सिजलिंग अशी कॅप्शन दिली होती.

बिग बॉस १४ च्या हंगामात राखीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. आता ती बिग बॉसच्या १५ व्या हंगामामुळेही चर्चेत आली आहे.

हे ही वाचा :

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

Back to top button