Harinam Kaur : पुरुषांसारखी दाढी-मिशी असूनही ‘ती’चे सौंदर्य मोहून टाकते | पुढारी

Harinam Kaur : पुरुषांसारखी दाढी-मिशी असूनही 'ती'चे सौंदर्य मोहून टाकते

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्त्रीचं सौंदर्य तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कळतं. अनेक जण तिच्या सुंदर दिसणाऱ्या चेहऱ्याला भाळतात. तिच्या प्रेमात पडतात. पण, एखाद्या स्त्रीला पुरुषांसारखी मिशी आणि दाढी असेल तर? तुम्ही तिच्या प्रेमात पडाल? नाही ना? पण, मिशी आणि दाढी असणाऱ्या ‘या’ सुंदर तरुणीचा (Harinam Kaur) फोटो पाहिला तर, तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. कारण, पुरुषांसारखी मिशी-दाढी असनूही ती अफाट सुंदर दिसते.

या सुंदर स्त्रीचं नाव आहे हरिनाम कौर. तिच्या या अनोख्या सुंदर चेहऱ्यामुळे ती कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियामध्ये व्हायरल होत राहतात. ती सध्या ब्रिटेनमध्ये राहते. तिच्या मिशी-दाढीमुळे हरिनामंच नाव गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्येदेखील नोंदविण्यात आलं आहे. हरिनाम ही एक यशस्वी सोशल मीडिया स्टार आणि एक माॅडेल आहे.

इतकंच नाही तर ती एक मोटिव्हेशन स्पीकरदेखील आहे. कित्येक माध्यम संस्थांनी तिचा फोटो कव्हर फोटो म्हणूनही प्रसिद्ध केलेला आहे. तिच्यासोबत एक सेल्फी मिळावा, यासाठी अनेक जण तरसतात. आज भलेही हरिनाम एक सस्केस स्त्री असेल. पण, सुरूवातीचा काळ तिच्या संघर्षांनी भरलेला आहे.

स्त्री असून चेहऱ्यावर मिशी-दाढी येत असल्याममुळे ती पूर्वी खूप त्रस्त असायची. लोक तिला तृतीयपंथीच्या नजरेतून पाहायचे. त्यामुळे ती खूप तणावात होती. दाढी असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाण्यास ती संकोच करत होती. पण, तीच कमजोरी आज तिची ताकद झाली आहे.

‘या’ आजारामुळे तिला आली दाढी!

हरिनाम कौर (Harinam Kaur) जेव्हा १२ वर्षांची होती, त्यावेळी तिला पाॅलिसिस्टिक ओवरी सिड्रोम नावाची आजार झाला. याच कारणामुळे इतर मुलींच्या तुलनेत हरिनामच्या शरीरावरील केस वाढू लागली. चेहऱ्यावर केस असल्यामुळे शाळेत, समाजात ती चेष्टेचा विषय व्हायची. इतकंच नाही तिचे नातेवाईकदेखील तिची चेष्टा करायचे.

दाढी येऊ नये म्हणून तिने खूप उपाय करून पाहिले. केस येऊ नये म्हणून क्रिम वापरले. पण, काहीच फायदा झाला नाही. शेवटी हरिनामने चेहऱ्यावरील केस कापणं बंद केलं. तिने स्वतःला ती जशी आहे तसं स्वीकारलं. पण, तिची कमजोरीच तिची ओळख झाली आहे आणि फॅशनच्या विश्वात ती यशस्वी नाव आहे.

हे वाचलंच का? 

Back to top button