ती परत आलीये : अ‌सं डोहाळे जेवण कधी पाहिलंय का? (Video) | पुढारी

ती परत आलीये : अ‌सं डोहाळे जेवण कधी पाहिलंय का? (Video)

मुंबई; पुढारी ऑनलाईन : झी मराठीवर ती परत आलीये ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. ती परत आलीये चांगलीच रंगत चालली आहे. या मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय.

किलारी भूकंप : २८ वर्षानंतरही ‘ती’च भीती अन् भोग कायम!!!

नाशिक : गिरणा धरणातून ५००० क्युसेक्स विसर्ग सुरू (video)

या मालिकेत रोहिणीची व्यक्तिरेखा ही गरोदर दाखवण्यात आलीय. रिसॉर्टवर अडकल्यापासून या सर्व मित्र मैत्रिणींच्या आयुष्यात खूप काही घडतंय. त्यात रोहिणी गरोदर असल्यामुळे तिची काळजी सगळ्यांनाच आहे. त्यामुळे तिचं डोहाळे जेवण करण्याचं सर्वजण ठरवतात.

AUSW vs INDW : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

गुलाब चक्रीवादळ! नंदुरबारमध्ये हजारो हेक्‍टरवर पिकांची नासाडी

डोहाळे जेवणाचा कार्यक्रम चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’ मधील कोणी तरी येणार येणार गं गाण्याशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे मालिकेत देखील वातावरणातील गंभीरता कमी करण्यासाठी डोहाळे जेवण करतात. अगदी उत्साहात रोहिणीचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होको. विशेष म्हणजे कुणीतरी येणार येणार गं हे गाणं देखील त्यात वाजताना दाखवलंय.

कोल्हापूर : जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश यादी जाहीर

BBM : शिवलीला पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे घराबाहेर

या गाण्यावर हणम्या म्हणजे अभिनेता समीर खांडेकर आणि म्हणजेच अभिनेता प्रथमेश हे दोघे थिरकताना दिसतील. या गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान सर्व कलाकारांनी धमाल केली आणि या गाण्याच्या शूटिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

नेटिझन्सना देखील सर्व कलाकारांची शूटिंग दरम्यान चालली मजा मस्ती पाहून धमाल येतेय. ती परत आलीये मालिकेत आलेले हे आनंदाचे क्षण किती वेळ टिकतील? या आनंदावर विरजण पाडण्यासाठी ‘ती’ काही अघटित घडवून आणणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

मुंबई : आरे कॉलनीत ज्येष्‍ठ महिलेवर बिबट्याचा हल्‍ला; घटना सीसीटीव्हीत कैद (Video) 

पोटॅशियमची कमतरता? 

मणक्याच्या दुखण्याकडे नको दुर्लक्ष

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

Back to top button