पुढारी ऑनलाईन डेस्क: आधार कार्ड हे ओळखपत्र सर्व नागरिकांसाठी अनिवार्य आहे. हे एक महत्वपूर्ण ओळखपत्र असून सर्वच ठिकाणी याची आपल्याला गरज पडते. पाच वर्षांच्या आतील मुलासाठी काढण्यात येणार्या कार्ड ला 'बाल आधार कार्ड' असे म्हटलं जाते. तर 'बाल आधार कार्ड' कसे काढायचे ते जाणून घेवूया ….
बालकापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण आधार नोंदणी करु शकतो. आधार हा यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) देशातील नागरिकांसाठी जारी केलेला १२ अंकी ओळख क्रमांक आहे. पाच वर्षांच्या आतील मुलासाठी काढण्यात आधार काढण्याची प्रक्रिया थोडी वेगळी असते.
'यूआयडीएआय'ने मुलांच्या आधार काढण्यासाठी नियमांमध्ये किरकोळ बदल केले आहेत.आता पालकांना आपल्या मुलांचे आधार काढण्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये मुलाचा जन्म झाला आहे येथील पावतीच्या आधारे आधार अर्ज करु शकतात. तसेच पाच वर्षांच्या आतील मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी त्यांच्या डोळ्यांचे रेटिना आणि पाच बोटांच्या फिंगर प्रिंट देण्याची गरज असत नाही. पाच वर्षांच्या आतील मुलांचे बायोमेट्रिक नाेंद केली जात आहे.
मुलांसाठी आधार कार्ड काढण्यासाठी काही कागदपत्रे अनिवार्य आहेत. यामध्ये आई-वडिलांचा पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदान ओळखपकत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड आदी कागदपत्रांचा या मध्ये समावेश आहे.
♦सर्वप्रथम तुम्ही 'यूआयडीएआय'च्या अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in वर जावा
♦यानंतर आधार कार्ड नोंदणी हा पर्याय निवडा आणि आवश्यक ती सर्व माहिती भरा
♦यामध्ये पत्ता, परिसर राज्याची माहिती देवून अर्ज सबमिट करा
♦यानंतर बाल आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी (Appointment ) क्लिक करा.
♦जवळच्या आधार कार्ड केंद्राची निवड करा आणि Appointment घ्या.
♦ यानंतर 'यूआयडीएआय' तुम्हाला तारीख देईल यानंतर संबंधित केंद्रावर जावून तुम्ही बाल आधार कार्ड तयार करु शकता.
हेही वाचलं का ?