AUSW vs INDW : स्मृतीच्या गुलाबी चेंडूवरील पहिल्या शतकाची प्रतिक्षा लांबली | पुढारी

AUSW vs INDW : स्मृतीच्या गुलाबी चेंडूवरील पहिल्या शतकाची प्रतिक्षा लांबली

क्वीन्सलँड ; वृत्तसंस्था : भारतीय आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट (AUSW vs INDW) संघामधील एकमेव डे-नाईट कसोटी सामन्‍यात  नाणेफेक जिंकत ऑस्‍ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. (AUSW vs INDW) प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाच्‍या सलामीवीर स्‍मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी दमदार सुरुवात केली. मात्र मेल्युनेक्सने शेफाली वर्माला 31 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला.

खराब हवामानामुळे सामना थांबवला

लंचनंतर सामना सुरु झाला तेव्‍हा स्‍मृतीने १२९ चेंडूचा सामना करत ७० धावांवर खेळत हाेती तर पूनम राउत हिने संयमी खेळी करत ४४ चेंडूत ८ धावा केल्‍या. सध्‍या खेळपट्‍टीवर स्‍मृती आणि पूनम आहेत. खराब हवामानामुळे सामना थांबविण्‍यात आला तेव्‍हा भारताने १ बाद ११४ धावा केल्‍या होत्‍या.

दरम्यान, काही काळाने पावसाने उसंत दिली आणि स्मृती मानधना 80 धावांपर्यंत पोहचली. शतकाच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या स्मृतीचे शतक पूर्ण होण्यापूर्वीच पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केली. या पावसामुळे पहिल्या दिवसाचा पुढचा सगळा खेळ वाया गेला. अखेर पंचांनी दिवस संपल्याची घोषणा केली. दिवस संपला त्यावेळी भारताच्या 44.1 षटकात 1 बाद 132 धावा झाल्या होत्या. स्मृती 80 धावांवर तर पुनम राऊत 16 धावा करुन नाबाद होती.

टीम इंडिया पहिल्यांदाच खेळणार गुलाबी चेंडूवर

भारतीय आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट (AUSW vs INDW) संघामधील एकमेव डे-नाईट कसोटी सामना क्वीन्सलँडमध्ये आजपासून सुरू  झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील तिसरी वन-डे जिंकल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय महिला संघ प्रथमच गुलाबी चेंडूवर कसोटी सामना खेळत आङे.. या चेंडूने खेळण्याचा भारतीय महिलांना अनुभव नाही. ऑस्ट्रेलियाने डे- नाईट कसोटी सामना यापूर्वी नोव्हेंबर २०१७मध्ये खेळला होता.

भारताने सात वर्षांनंतर पहिली टेस्ट खेळताना गेल्या जूनमध्ये इंग्लंडविरुद्धचा सामना अनिर्णीत राखला होता. मात्र, ऑस्ट्रेलियात आणि तेसुद्धा गुलाबी चेंडूने खेळणे भारतीय संघासाठी फारच आव्हानात्मक ठरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १५ वर्षांपूर्वी म्हणजे २००६ मध्ये कसोटी सामना झाला होता. भारतीय संघातील मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनाच कसोटीचा अनुभव आहे.

हेही वाचलं का ? 

Back to top button