डॉलीबाई श्रीखंड लई गोडय! श्वेता शिंदे हिच्या सेक्सी नऊवारीनं मन झालं उधाण

पुढारी ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी विदाऊट ब्लाऊज साडीवर फोटोशूट केल्याने अभिनेत्री श्वेता शिंदे चर्चेत आली होती. आता श्वेता शिंदे पुन्हा चर्चेत आलीय. कारण आहे-तिचा नऊवारीतला सेक्सी लुक. तिला निळ्या नऊवारीत पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा! क्या बात है?
- ‘ज्ञानेश्वर माउली’ : चिन्मय मांडलेकरची आळंदीला भेट (Photos)
- ती परत आलीये : असं डोहाळे जेवण कधी पाहिलंय का? (Video)
श्वेताने निळ्या नऊवारी साडीत फोटोशूट केलं आहे. निळी साडी आणि लाल रंगाचं ब्लाऊज, त्यावर ऑक्साईड ज्वेलरी तिने घातली आहे. खूपचं सुंदर अशी कमेंट्स देऊन नेटकरी तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडलेत. एका नेटकऱ्याने तिला डॉलीबाई श्रीखंड लई गोडय! अशी कमेंट दिलीय. तर आणखी एकाने तू दिवसेंदिवस उजळत चलली आहेस, अशी कमेंट दिलीय.
झी युवा वाहिनीवर देवदत्त नागे आणि श्वेता हे ‘डॉक्टर डॉन’ या विनोदी मालिकेत दिसले. यामध्ये तिची डॉलीबाई ही व्यक्तीरेखा आहे. अवंतिका, अवघाची हा संसार आणि वादळवाट अशा मराठी मालिकांमध्ये तिने काम केलंय.
- डान्सिंग गर्ल सलोनी सातपुते हिचा ‘पैंजण तुझं’ गाण्यातून हॉट लूक
- BBM : शिवलीला पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे घराबाहेर
श्वेता शिंदेविषयी जाणून घ्या या गोष्टी
साताऱ्याची श्वेता शिंदे मुंबईत येऊन कशा प्रकारे आपलं करिअर यशस्वी केलं, पाहुया. श्वेताने अभिनय करता करता निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले.
- AUSW vs INDW : स्मृती मंधानाचे अर्धशतक
- सांगली : विट्यात परप्रांतीय जोडप्यात वाद; पतीकडून पत्नीचा खून
लागीर झालं जी आणि मिसेस मुख्यमंत्री, देवमाणूस या मालिकांची तिने निर्मिती केली. या मालिका गाजल्याही. श्वेताचा जन्म साताऱ्यात झाला. पुढे शिक्षणासाठी म्हणून ती मुंबईत आली.
‘कुमकुम’, ‘घराना’ या हिंदी मालिका आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘लक्ष्य’ या मराठी मालिकांमधून तिने दमदार अभिनय केला. मालिकांसोबतचं तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘देऊळबंद’, ‘इश्श्य’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असे तिचे चित्रपट आहेत.
श्वेताने लग्न झाल्यानंतर ब्रेक घेतला होता. पुढे लक्ष्य या मालिकेतून तिने पुन्हा पडद्यावर कमबॅक केले. श्वेताचा नवरादेखील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
पती आहे प्रसिध्द अभिनेता
श्वेताच्या पतीचे नाव संदीप भन्साळी आहे. तो एक हिंदी मालिकेतील अभिनेता आहे. वो रहनेवाली महलों की, इश्वर साक्षी, क्रीस औक कृष्णा, मोहिनी, प्यार के दो नाम-एक राधा एक श्याम या हिंदी मालिकांमध्ये तो दिसला होता. श्वेता-संदीपची अपराधी कौन या मालिकेच्या सेटवर ओळख झाली होती. २००७ मध्ये दोघांनी विवाह केला. संदीपचा कपड्यांचा मोठा बिझनेस आहे.
हेही वाचलं का?
- गुलाब चक्रीवादळ! नंदुरबारमध्ये हजारो हेक्टरवर पिकांची नासाडी
- कोल्हापूर : जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश यादी जाहीर
- Harinam Kaur : पुरुषांसारखी दाढी-मिशी असूनही ‘ती’चे सौंदर्य मोहून टाकते
View this post on Instagram