मुंबई; पुढारी ऑनलाईन : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ७२५ व्या संजीवन समाधी वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडाची जीवनगाथा सोनी मराठी वाहिनी घेऊन येत आहे. आजपासून सोम.-शनि., संध्या. ७ वा. 'ज्ञानेश्वर माउली' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने आज २७ सप्टेंबर रोजी अभिनेते आणि मालिकेचे निर्माते चिन्मय मांडलेकर याने आळंदीला भेट दिली. चिन्मय मांडलेकर याने आळंदीत जाऊन ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा उलगडणार आहे.
चिन्मय मांडलेकर आणि दिग्पाल लांजेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.
दिग्पाल या मालिकेचे दिग्दर्शन देखील करत आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञानेश्वरांची गाथा पाहायला मिळेल.
पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार आहे.
पाहा, 'ज्ञानेश्वर माउली', आजपासून संध्या. ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर.