मुंबई; पुढारी ऑनलाईन : कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठी कार्यक्रमाची चर्चा रंगलीय. कार्यक्रमाच्या या पर्वातील सदस्यांनादेखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. बिग बॉस हा कार्यक्रम आणि अनिश्चितता यांच खूप जवळच नातं आहे. या खेळात कधी काय घडेल ? हे कोणीचं सांगू शकत नाही. आता शिवलीला पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे घराबाहेर झाल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये दोन सदस्यांची नावं गाजली. एक म्हणजे तृप्ती देसाई. दुसरे हाेते शिवलीला पाटील.
वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या दोन्ही महिलांनी पहिल्याचं दिवसापासून प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित केले. नुकतचं शिवलीला यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले हाेते की, "इथला प्रत्येक माणूस माझा असेल". त्यांच्या या वाक्याने सदस्यांबरोबरचं प्रेक्षकांची मने देखील जिंकली. पण, शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली.
आज बिग बॉस यांनी जाहीर केलं. आणि त्यांना वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे आजपासून त्यांच्यासाठीच्या व्होटिंग लाईन्स बंद राहतील.
दरम्यान, घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, दिलेल्या कार्यातील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या सर्व गोष्टी नॉमिनेशनसाठी असतील. या निकषांवर घरातील सदस्यांनी एकूण सात सदस्यांना घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले होते.
त्यावेळी शिवलीला म्हणाल्या होत्या की, सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत . मला गेम कळायला थोडा वेळ लागला; पण इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग दिसेल. बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे. इथे फक्त गॅसिप एवढचं केलं जातं असं प्रत्येक जण म्हणतं. पण मी असा विचार करून आले होते.