Weight Loss : ‘या’ आजरांमुळे होते अचानक वजनात घट !!!

वजन कमी केल्यानंतर...
वजन कमी केल्यानंतर...
Published on
Updated on

कोणत्याही प्रयत्नांशिवाय वजन वेगाने घटत असेल तर ते एखाद्या सामान्य किंवा गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. कोणत्याही प्रयत्नांशिवाय आहे त्या दिनचर्येत तर वेगाने वजन घटू (Weight Loss) लागले तर ते आरोग्याच्या असमतोलाविषयी संकेत देत असते. त्याकडे अजिबातच दुर्लक्ष नको.

आरोग्याच्या समस्यांमुळे जर व्यायाम, जिम न करता, आहारात कोणतेही बदल न करता दोन-तीन महिन्यांत व्यक्तीचे वजन 5-6 किलोने कमी होऊ शकते. वजनात वेगाने घट (Weight Loss) होत असेल तर साध्याशा आजारापासून ते गंभीर आजारापर्यंत कोणत्याही आजाराचे संकेत यातून मिळत असतात.

* मधुमेह : मधुमेहाची समस्या असेल तर सुरुवातीच्या काळात वजन अचानक घटू लागते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा परिणामस्वरूप वजन घटते; शिवाय थकवा, लघवी करताना घाम येणे, रात्री झोपताना घाम येणे यांसारखी लक्षणे मधुमेहाच्या सुरुवातीला दिसू शकतात.

* थायरॉईड : थायरॉईडच्या समस्येमुळे अचानक वजन कमी होऊ शकते. सर्वाधिक समस्या ही ओव्हर अ‍ॅक्टिव्ह थायरॉईड ग्रंथी म्हणजे हायपरथायरॉईडिझममुळे होते. त्याशिवाय मनोवस्थेत बदल, गिळण्याची समस्या, थकवा, श्वास घेण्यात समस्या आणि घाम येणे ही देखील लक्षणे दिसतात.

* कर्करोग : कर्करोग हा अत्यंत घातक आजार आहे. त्याचे जर वेळेवर निदान झाले नाही तर हा आजार खूप घातक आणि जीवघेणा ठरू शकतो. कर्करोगाने पीडित व्यक्तीचे वजन खूप वेगाने कमी होते. वजन कमी होत असताना दिवसभर थकल्यासारखे वाटत असेल तर ही कर्करोगाची लक्षणे आहेत.

* क्षयरोग : टीबी किंवा क्षयरोग झाल्यासही वजन झपाट्याने कमी होते. क्षयरोगाचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे सतत दोन आठवडे खोकला येतो. क्षयरोग मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोलिस जीवाणूंमुळे होतो. वजन कमी होण्याबरोबरच छातीत वेदना, रात्री झोपताना घाम येणे, थकवा इत्यादी प्रमुख लक्षणे दिसतात.

* तणाव : तणाव हा व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक आजारांचे ते एक कारण आहे. तणावामुळे रात्री झोप लागत नाही तसेच वेगाने वजन घटते. त्यासाठी मेडिटेशन आणि योगा करण्याची गरज आहे.

* एचआयव्ही – एड्स : एचआयव्ही हा लैंगिक संबंधातून होणारा संसर्ग आहे. त्याची शेवटची पायरी म्हणजे एड्स. वेगाने वजन कमी होणे हे देखील या आजाराशी निगडित लक्षण आहेत. त्यामुळे वजन कमी होणे दुर्लक्षित करू नका.

* इतर काही आजार : इतरही काही आजारांमध्ये वजन वेगाने घटते. पोटाची समस्या, हार्मोन्समधील बदल, सीओपीडी आणि पार्किन्सन्स या आजारांमध्येही वजन कमी होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news