पोटॅशियम हे शरीरासाठी अत्यावश्यक इलेक्ट्रोलाईटस् आहेत. पोषक घटक पेशींच्या आतपर्यंत पोहोचण्यास पोटॅशियमची मदत होते. उच्च रक्तदाब आणि हायपर टेन्शनचा त्रासही यामुळे वाढू शकतो.
सर्वसाधारणपणे लोक जीवनसत्त्व, प्रथिने, खनिजे आणि लोह यांची शरीराला असणारी गरज जाणतात. मात्र, एक महत्त्वाचा घटक पोटॅशियम मात्र कायमच दुर्लक्षिला जातो. मात्र, पोटॅशियमच्या कमतरतेमुळे शरीराला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. पोटॅशियम एक असे खनिज आहे जे शरीरासाठी आवश्यक असते.
पोटॅशियम हृदय, किडनी आणि इतर अवयवांचे काम योग्य प्रकारे सुरू राहण्यासाठी आवश्यक असते. पोटॅशियम असे इलेक्ट्रोलाईट आहे जे ऊती, पेशी, नसा आणि स्नायूंसाठी आवश्यक आहे.
पोटॅशियममुळे पोषक घटक पेशींच्या आत आणि विषारी पदार्थ पेशींच्या बाहेर टाकण्यास मदत होते. त्यासाठी पोटॅशियमच्या कमतरतेमुळे शारीरिक लक्षण दिसल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्याची कमतरता पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
* पोटदुखी आणि जुलाब होणे
* शरीरातील पाणी कमी होणे, निर्जलीकरण होेणे
* मळमळणे आणि उलटी होणे, हृदयाचे ठोके वाढणे
* रक्तदाब वाढणे
* स्नायूंमध्ये वेदना होणे
* सततचा थकवा आणि अशक्तपणा
* सोडियमचे प्रमाण वाढणे
* भूक न लागणे आणि खाण्यावरची वासना उडणे
पोटॅशियमच्या कमतरेमुळे दोन आजार होऊ शकतात. पोटॅशियम हे असे खनिज आहे जे शरीराच्या हालचालींशी निगडीत संकेत मेंदूपर्यंत पोहोचवते. शरीरात पोटॅशियमची कमतरता असल्यास हे संकेत मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे तणाव आणि औदासिन्याची समस्या होण्याचा धोका असतो. तणावाचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर पडतो.
त्याशिवाय उच्च रक्तदाब आणि हायपर टेन्शन होण्याचा धोकाही संभवतो. शरीरातील पोटॅशियमची पातळी जशी घसरू लागते तशी मेंदूची कार्यक्षमताही प्रभावित होते. त्यामुळे मनोवस्थेत बदल होतात. तसेच, विचारांतही बदल होतात. त्यामुळे शरीरातील पोटॅशियमची कमतरता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
टोमॅटो, बटाटा, केळी, बिन्स, हिरव्या पालेभाज्या, दही, मासे, मशरूम आदींमध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप अधिक असते. त्यामुळे पोटॅशियमच्या कमतरतेची लक्षण दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि पोटॅशियमची कमतरता पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.