मुंबई; पुढारी ऑनलाईन : नर्मदा सिनेव्हिजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित 'जिंदगानी' चित्रपटाद्वारे वैष्णवी शिंदे हिचे चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. या चित्रपटात अभिनेते शशांक शेंडे आणि अभिनेते विनायक साळवे यांसमवेत वैष्णवी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
'जिंदगानी' या पहिल्या चित्रपटात काम करतानाच्या अनुभवाबद्दल वैष्णवी सांगितले आहे की, "चित्रीकरणाची संपूर्ण प्रोसेस माझ्यासाठी खूपच नवीन होती. त्यामुळे 'जिंदगानी' चित्रपटात काम करायची संधी मला मिळाली यांचा मला आनंद झाला आहे.
चित्रीकरणादरम्यान अनेक गोष्टी मला शिकता आल्या.
शशांक शेंडेंसारख्या दिग्गज कलाकारांबरोंबर काम करण्याचे अविस्मरणीय क्षण गाठीशी बांधता आले."
अभिनेते शशांक शेंडेंसोबत काम करतानाच्या अनुभवाबद्दल वैष्णवी म्हणते की, "हा माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे आणि शशांक सरांइतके दिग्गज कलाकार समोर असल्यामुळे सुरुवातीला मला खूप दडपण आलं होत. परंतु, हे जेव्हा शशांक सरांना कळलं तेव्हा त्यांनी मला खूप छानप्रकारे सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. सेटवरील संपूर्ण वातावरण एकदम हसतं-खेळतं केलं त्यामुळे शूटिंग करायला खूप मजा आली.
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेली वैष्णवी 'जिंदगानी' चित्रपटात अभिनय करण्याच्या मिळालेल्या संधींसंदर्भात सांगते की, "मी शाळा आणि कॉलेजमध्ये नाटकात आणि वार्षिक महोत्सवात दरवर्षी न चुकता भाग घेत असे. त्याचबरोबर एखाद्या चित्रपटातील पात्र मला आवडलं तर घरी येऊन तसंच तयार होऊन फोटो काढायला मला आवडतं.
माझ्या घरी माझे वेगवेगळ्या पात्रांच्या वेशभूषेतील फोटोज देखील लावलेले आहेत.
एकदा दिग्दर्शक विनायक भिकाजीराव साळवे सहज एका कामानिमित्त घरी आले असता त्यांनी माझे घरी लावलेले फोटोज पाहून माझ्यातील अभिनय कला जाणली आणि मला 'जिंदगानी' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित 'जिंदगानी' हा बदलत्या काळानुसार माणसाच्या बदलत्या जीवनशैलीची जीवनगाथा सांगणारा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचलंत का?