सबाने घेतली एक्स बॉयफ्रेंडची गळाभेट | पुढारी

सबाने घेतली एक्स बॉयफ्रेंडची गळाभेट

हृतिक रोशन सबा आझाद हिला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वी हृतिक आणि सबा लंडनला फिरायला गेले होते, त्यावेळी हृतिकने सबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते; मात्र अनेकांना हृतिक आणि सबाची जोडी अजिबातच आवडत नाही. त्यांच्या फोटोंवर बाप आणि लेकीची सुंदर जोडी म्हणत अनेकजण कमेंट करत त्यांना हिणवले आहे. पुन्हा हृतिक आणि सबा चर्चेत आले आहेत. हृतिक, सबा आणि सबाच्या एक्स बॉयफ्रेंडचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबईतील एका हॉटेलबाहेरचा असल्याचे सांगितले जात आहे. सबा ही हृतिकच्या अगोदर इमाद शाह याला डेट करत होती. मात्र, काही गोष्टींमुळे या दोघांमध्ये ब—ेकअप झाले आणि ती आता हृतिक रोशनला डेट करत आहे. हृतिक, सबा आणि इमाद शाह एका हॉटेलमध्ये भेटले होते आणि तिथेच त्यांनी जेवणही केले. हॉटेलच्या बाहेर पडताना हृतिकने इमाद शाह याची गळा भेट घेतली. इतकेच नाही तर सबाने देखील इमाद शाहची गळा भेट घेतली.

Back to top button