

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझा सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. नेहमी ती आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्याही असाच हटके अंदाजातील जेनेलिया डिसूझा हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
नुकतेच जेनेलिया डिसूझा हिने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जेनेलियासोबत तिचा पती रितेश देशमुख, रितेशचा मित्र शबीर अहलुवालिया आणि त्याची पत्नी कांची कौल हे चौघे डान्स करताना दिसत आहेत.
या व्हिडिओत रितेश लाल रंगाच्या जॅकेटसोबत पॅट तर जेनेलिया काळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. यासोबत शबीर आणि कांची पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे.
यात सर्वजण एका धबधब्याखाली पाण्यासोबत एन्जॉय करताना दिसत आहेत. याच दरम्यान उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या गाजलेले 'टीप टीप बरसा पानी' (हिप- हॉप रीमिक्स) गाणे वाजत आहे. या व्हिडिओत रितेशने जेनेलियाच्या अंगावर पाणी मारत असताना जेनेलिया पाण्यातून बाहेर येताना दिसत आहे.
या व्हिडिओवरून रितेश- जेनेलिया दोघेजण आनंदित असून सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत जेनेलियाने 'टीप टिप बरसा पानी' अशी कॅप्शन लिहिली आहे. यासोबत जेनेलियाने रितेशचा मित्र शबीर आणि कांचीला टॅग केले आहे.
हा व्हिडिओ शेअर होताच चाहत्यांनी कॉमेंन्टसचा पाउस पाडला आहे. यात एका युजर्सने 'रितेश सर जी सोबत पाण्यात डान्स करा', दुसऱ्या एका युजर्सने 'तुमची मजा पाहून मलाही एन्जॉय करू वाटत आहे' असे लिहिले आहे.
एवढेच नाही तर, चाहत्यांनी या व्हिडिओला फायर आणि हार्ट इमोजी शेअर केला आहे. रितेश आणि जेनेलिया नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. रितेश देशमुख आगामी 'बच्चन पांडे' या चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचलंत का?