belgaon crime : उधारीवर पान न दिल्याने बेळगावात एकाचा निर्घृण खून

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास वडगाव येथे खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळकृष्ण नागेश शेट्टी (वय 50, मूळ रा. कुंदापूर जि. उडपी, सध्या रा. लक्ष्मीनगर तिसरा क्रॉस, वडगाव) (belgaon crime) असे मृताचे नाव आहे.  पानपट्टीतील पान व अन्य साहित्य उधार दिले नसल्याचा रागातून चाकूने सपासप वार करत एकाने हा खून केला. (Murder of a person in Belgaum due to trivial reasons)

या प्रकरणी दत्तात्रय उर्फ दत्ता शिवानंद जंतीकट्टी (रा. भारतनगर दुसरा क्रॉस, शहापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

दत्तात्रय हा  बाळकृष्ण यांच्या पानपट्टीत पान व अन्य साहित्य खरेदीसाठी जात असे. मंगळवारी रात्रीही तो नेहमीप्रमाणे पानपट्टीवर जाऊन उधारी मागू लागला. (belgaon crime)

यावेळी बाळकृष्ण यांनी आधीची उधारी चुकती कर, तोपर्यंत उधार देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे चिडलेल्या दत्तात्रयने स्वतः जवळ असलेल्या चाकूने बाळकृष्ण यांच्या छाती, पोट व चेहऱ्यावर चाकूने सपासप वार केले.

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बाळकृष्ण यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री या घटनेची शहापूर पोलिसात नोंद झाली आहे.

पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांच्याकडून तपास सुरू आहे.

Back to top button