प्रियांका गांधी भाजप नेत्या स्मृती इराणींना देणार चॅलेंज? | पुढारी

प्रियांका गांधी भाजप नेत्या स्मृती इराणींना देणार चॅलेंज?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी वर्षात उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसच्या महासचिव आणि यूपीच्या प्रभारी प्रियांका गांधी-वाड्रा अमेठी किंवा रायबरेली या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. राजकीय इतिहास पाहता या मतदार संघातून गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने विधानसभेची निवडणूक लढवलेली नव्हती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका यांची प्रथम पसंती अमेठी आहे. कारण, लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांचे बंधू राहूल गांधी यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केलेला होता. त्याचा बदला घेण्यासाठी अमेठीत आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पोषक वातावरण तयार करत आहे. कारण, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या स्मृती इराणी यांना चॅलेंज देण्यासाठी प्रियंका गांधी हा निर्णय घेतला असावा, असं मत राजकीय विश्लेषक मांडतात.

प्रशांत किशोर यांनी दिला सल्ला 

लखनऊमध्ये झालेल्या काॅंग्रेसच्या बैठकीत सल्लागार समितीने प्रियांका गांधी यांना सल्ला दिला होता की, निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर उत्तरप्रदेशमध्ये नवी ताकद मिळेल. रणनितीकार प्रशांत किशोर यांनी प्रियंका गांधी यांना सल्ला दिला होता की, प्रियंका यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वतः उतरायला हवं.

रायबरेली किंवा अमेठीच का? 

राजकीय जाणकारांच्या मते २०१९ च्या लोकसभा निवडुकीत राहूल गांधी यांचा पराभव झाला होता. त्यामुळे गांधी कुटुंबाचा दबदबा कमी झालेला होता. त्यात काॅंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे रायबेरलीमध्ये गांधी परिवाराचा लोकांचा संपर्कही कमी झाला.

अशा परिस्थितीत प्रियांका गांधी यांनी अमेठी किंवा रायबरेलीमधून निवडणूक लढवली, तर काॅंग्रेस पक्षाला नवी ताकद मिळू शकते. रायबरेली आणि अमेठी हा गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला होता. या मतदार संघातील काॅंग्रेसचं गेलेली पत पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रियांका प्रयत्न करत आहेत. अशा माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी औपचारिकरित्या सांगितलं आहे की, उत्तरप्रेदशच्या विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधीचाच चेहरा असणार आहे.

पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय ?

Back to top button