ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ४०० अरबच्या संपत्तीचा वाद; तीन आत्यांनी केला दावा | पुढारी

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ४०० अरबच्या संपत्तीचा वाद; तीन आत्यांनी केला दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पानिपतचे युद्ध आणि त्यानंतर उत्तर भारतात आपला दबदबा निर्माण करणारे ग्वाल्हेरचे शिंदे घराण्यात सध्या संपत्तीचा वाद सुरू आहे. हा वाद कोर्टात गेला असून यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या तीन आत्या कारणीभूत आहेत.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया, नेपाळच्या राजघराण्यातील उषाराजे सिंधिया आणि सर्वात छोटी आत्या यशोधरा राजे सिंधीया आता कोर्टात गेल्या आहेत.

याआधी हे प्रकरण कोर्टाच्या बाहेर सहमतीने मिटविण्याचे पत्र कोर्टात सादर केले होते, मात्र, ते मागे घेतले आहे.

या सगळ्या वादाला ज्योतिरादित्य शिंदे यांची लहान आत्या यशोधरा राजे कारणीभूत आहे.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात या वादाचा उल्लेख करण्यात आला आहे.

संपत्तीच्या वादात वसुंधरराजे आणि उषाराजे या फारसे लक्ष घालत नाहीत मात्र, यशोधराराजे आपला वारसा हक्क सोडायला तयार नाहीत.

चार दशके सुरू आहे वाद

ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याकडे प्रचंड संपत्ती आहे. मात्र, बहुतांश संपत्तीचा वाद कोर्टात आहे. त्यामुळे त्याबाबत अधीकृतरित्या कुणीच बोलायला तयार नाही.

मात्र, असे सांगितले जाते की, देशभरातील कित्येक राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त संपत्ती त्यांच्याकडे आहे. गेल्या चार दशकांपासून हे घराणे संपत्तीच्या वादात अडकले आहे.

असे बोलले जाते की, ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये गेल्यानंतर हा वाद मिटण्याची शक्यता होती, मात्र, दीड वर्षांनंतरही त्यात काहीच प्रगती दिसत नाही.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘द हाऊस ऑफ सिंधियाज’ या पुस्तकात उल्लेख आहे की, संपत्तीचा वाद वाढण्यासाठी मध्यप्रदेश सरकारमधील मंत्री यशोधराराजे सिंधिया याच कारणीभूत आहेत.

ज्योतिरादित्य आणि त्यांच्या तीन आत्या उषाराजे, वसुंधरराजे आणि यशोधराराजे या हा वाद आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करण्याच्या बाजुने होत्या.

त्यासाठी ज्योतिरादित्य आणि त्यांच्या आत्यांनी कोर्टात वकिलाकरवी अर्जही दिला होता. मात्र, २०१९ मध्ये त्यांच्या आत्यांनी हा अर्ज मागे घेतला.

नेपाळच्या राजघराण्यातील उषाराजे

ज्योतिरादित्य यांच्या आत्या मोठ्या आत्या उषाराजे या वादात फारसे लक्ष घालत नाहीत. त्याचा विवाह नेपालच्या राजघराण्यात झाला आहे.

त्यांच्या घराण्याकडेही प्रचंड संपत्ती आहे. त्या नेपाळमध्येच स्थायिक असून अधे मधे ग्वाल्हेरला येत असतात.

वसुंधराराजे धौलपूरच्या राणी

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या दुसऱ्या आत्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे या धौलपूरच्या राजमाता आहेत.

त्यांच्या कुटुंबाकडेही प्रचंड संपत्ती आहे. वसुंधरा आणि त्यांचा मुलगा दुष्यंत सिंग हे प्रकरण ताणू इच्छित नाहीत.

त्यांना संपत्ती नको आहे आणि हे प्रकरण ताणण्याइतका वेळही नाही, असे त्यांच्या नीकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

यशोधरा राजे यांना होऊ शकतो फायदा

मध्यप्रदेश सरकारमधील मंत्री यशोधराराजे या ज्योतिरादित्य यांच्या लहान आत्या. त्यांनी प्रेमविवाह केल्यानंतर परदेशात स्थायिक झाल्या होत्या.

मात्र, घटस्फोट झाल्यानंतर त्या भारतात परतल्या. त्यांचे पती कार्डिओलॉजिस्ट होते. लग्नानंतर त्या अमेरिकेत गेल्या त्यानंतर भारतात आल्या.

कालांतराने त्या राजकारणात गेल्या. असे सांगितले जाते की वारसा हक्काने येणाऱ्या संपत्तीबाबत त्या जास्त गंभीर आहेत.

जर आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट झाले तरीही त्यांना फायदा होऊ शकतो.

विजयाराजे यांच्या मृत्यूपत्रामुळे वाद

शिंदे परिवाराच्या संपत्तीचा वाद राजमाता विजयाराजे शिंदे हयात असताना सुरू झाला.

विजयाराजे आणि त्यांचे पुत्र माधवराव यांच्यात पटत नव्हते त्यामुळे त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात माधवराव आणि नातू ज्योतिरादित्य यांना संपत्तीतून बेदखल केले होते.

त्यांनी संपत्तीतील एक हिस्सा आपल्या तीन मुली उषाराजे, वसुंधराराजे आणि यशोधराराजे यांच्या नावावर केला होता.

या प्रकरणात माधवराव कोर्टात लढाई लढत होते, आता ज्योतिरादित्यही तेच करत आहेत.

४०० अरब पेक्षा जास्त संपत्ती

शिंदे घराणे १९५७ राजकारणात आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत दिलेल्या शपथपत्रांमध्ये संपत्तीचा उल्लेख आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी निवडणूक अर्जात उल्लेख केलेली संपत्ती होती २ अरब रुपयांहून अधिक असून त्या संपत्तीचा वाद नाही.

मात्र, ज्या संपत्तीबाबत कोर्टात वाद सुरू आहे त्याची अंदाजे किंमत ४० हजार करोड म्हणजे चारशे अरब रुपये.

शिंदे घराण्याचा जयविलास पॅलस प्रचंड मोठा असून त्यात ४०० खोल्या आणि ५६० किलो सोन्याने मढविलेले छत आहे.

हेही वाचा : 

Back to top button