Met Gala : यलो ऑम्लेट आणि नेक्ड ड्रेसची का होतेय चर्चा - पुढारी

Met Gala : यलो ऑम्लेट आणि नेक्ड ड्रेसची का होतेय चर्चा

पुढारी ऑनलाईन : ‘naked dresses’ to omelette gowns असा मेट गाला टॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. मेट गाला महोत्सवात नेहमीचं फॅशनची रंगतदार दुनिया पाहायला मिळते. फॅशन आणि स्टार्स यांचं समीकरण नेहमीचं कुतुहलाचं असतं. हजारो कॅमेऱ्यांच्या नजरा त्या फॅशनकडे आणि सेलेब्रिटींनी काेणती फॅशन केली आहे, त्याकडे असतं. असाच एका पॉप स्टारचा ड्रेस व्हायरल होतोय. ती पॉप स्टार आहे-रिहाना. मेट गाला इव्हेंटमध्ये रिहानाच्या यलो ऑम्लेट गाऊन (omelette gowns) सोबतचं किमकर्दाशियाच्या आणि नेक्ड ड्रेस (naked dresses) ची जोरदार चर्चा सध्‍या सोशल मीडियावर रंगलीय.

एका कार्यक्रमात रिहानाने यलो केप गाऊन घातला होता. हा ड्रेस २५ किलो वजनाचा आणि १६ फूट लांब  होता. पिवळा रंग आणि दिसायला ऑम्लेटसारखा असल्याने लोकांनी त्या ड्रेसला यलो ऑम्लेट ड्रेसचं नाव दिलं.

नेटकऱ्यांनी अशा प्रकारचे मीम तयार केले आहेत.
पिझ्झासारखा मीम तयार करून नेटकऱ्यांनी अशी खिल्ली उडवली आहे.

चीनच्या couturier Guo Pei याने तो गाऊन तयार केला होता. हा ड्रेस तयार करायला २ वर्ष लागल्याचं सांगितलं जातं.

हे मीम पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

, रिहानाच्या या यलो ऑम्लेट ड्रेसची मात्र काही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. काहींनी पिझ्झा, ब्रेड ऑम्लेट आणि फायर ऑम्लेट यासारखे मीम्स बनवून ते ट्विटरवर शेअर केले.

फ्राय पॅनमध्ये या ड्रेसच्या फोटोचे मीम व्हायरल झाले आहे.

किम कार्दशियनचा naked dresses

एका वर्षी मेट गाला इव्हेंटमध्ये किम कार्दशियनच्या लूककडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. तिने पिंक कार्पेटवर ace डिझायनर थिएरी मुगलरची न्यूड बॉडीकॉन ड्रेस (naked dresses) घातला होता.

किम कर्दाशिया
पिंक कलरच्या कार्पेटवर किम कर्दाशियाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

काय आहे मेट गाला?

Met Gala mauNd/ene कॉस्ट्यूम इंस्टिट्यूट गाला किंवा मेट बॉलदेखील म्हटलं जातं. खरंतरं, हे एक चॅरिटी गाला असतं. सूत्रांच्या माहितीनुसार, मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्ट्यूम इंस्टिट्यूटसाठी पैसे जमा करणे याचा उद्देश असतो. हा सोहळा न्यूयॉर्कमध्ये होतो.

मेट गाला असा एक इव्हेंट आहे. ज्यामध्ये इतर गोष्टीदेखील पाहिल्या जातात. यस सेलेब स्टेटस सिंबलदेखील म्हणतात. हा इतका मोठा सोहळा असतो की, २००४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानिया यांना या इव्हेंटमध्येचं लग्नासाठी प्रपोज केलं होतं. अनेक महागड्या पार्टीजपैकी एक आहे मेट गाला. सेलेब्समुळे इतकी महाग ही पार्टी झाली आहे.

मेट गाला सोहळ्यात गेल्यानंतर सेलेब्रिटी काय करतात?

मेट गाला सोहळ्यात आत गेल्यानंतर एक्झिबिशन पाहिलं जातं. त्यानंतर कॉकटेल पार्टी असते. त्यानंतर डिनर आणि मनोरंजन असतं.

जर एखाद्या ब्रँडने आमंत्रित केलं असेल तर?

असं म्हटलं जातं की, जर एखाद्या सेलेब किंवा ब्रँडमार्फत आमंत्रित केलं गेलं असेल तर त्या व्यक्तीला त्या ब्रँडचेचं कपडे घालावे लागतात. हा जाहिरातीचाही एक फंडा मानला जातो.

आणखी काही भन्नाट मीम तुम्ही पाहायलाचं हवेत

कुणी जाऊ शकतं मेट गालामध्ये ?

कोणताही सामान्य व्यक्ती या सोहळ्यात जाऊ शकत नाही. फंड जमा करणारे केवळ ते लोक जाऊ शकतात, ज्यांना आमंत्रण मिळालं असेल. त्याचबरोबर, मोठी वेटिंग लिस्टदेखील असते. या गालामध्ये  सेलेब्स किंवा एखाद्या क्षेत्रात उत्‍कृष्‍ट  कामगिरी केलेल्‍या व्‍यक्‍तींनाआमंत्रित केले जाते.

हेही वाचलं का ?

Met Gala मधील हेदेखील पाहा काही सुपर फोटोज- 

Back to top button