इंग्लंड कसोटी मालिका | 'रद्द झालेली फक्त एक कसोटी नाही, ती निर्णायक कसोटी' - पुढारी

इंग्लंड कसोटी मालिका | 'रद्द झालेली फक्त एक कसोटी नाही, ती निर्णायक कसोटी'

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

इंग्लंड कसोटी मालिका पूर्ण झाली पाहिजे असे वक्तव्य बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी केले. गांगुली यांनी सांगितले की इंग्लंड कसोटी मालिका पूर्ण होऊ शकली यामुळे आम्ही निराश झालो आहोत. एका ठराविक मर्यादेनंतर खेळाडूंवर आपण दबाव टाकू शकत नाही. गांगुली म्हणाले की इंग्लंड कसोटी मालिका पूर्ण होऊ शकली नाही याचे एकमात्र कारण म्हणजे कोरोनाचा उद्रेक आणि खेळाडूंची सुरक्षा.

सौरभ गांगुली यांनी सोमवारी इंग्लंड विरुद्धच्या रद्द झालेल्या पाचव्या कसोटीबाबत आपले मत व्यक्त केले. त्यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यात जो काही एकमेव कसोटी सामना खेळला जाईल त्याच्याकडे कसोटी मालिकेतला पाचवा आणि निर्णायक सामना म्हणूनच पाहिले गेले पाहिजे. गांगुली यांनी तो फक्त एक कसोटी सामना म्हणून पाहण्यास विरोध दर्शवला.

कसोटीशी कोणतीच तडजोड नाही

दरम्यान, इसीबीने आयसीसीला पत्र लिहून या सामन्याच्या भविष्याबाबत डीआरसी (वाद निवारण समिती) चा निर्णय मागितला आहे. पण, आयसीसीने अजूनपर्यंत तरी यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. कसोटी सामन्याचा पाचवा सामना मँचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॉफर्डवर खेळला जाणार होता. याबाबत सौरभ गांगुली म्हणाले की, आम्हाला इंग्लंड कसोटी मालिका पूर्ण व्हावी असे वाटते. कारण हा इंग्लंडमध्ये २००७ नंतर पहिला मालिका विजय असणार आहे. भारत या कसोटी मालिकेत २ – १ ने आघाडीवर आहे.

गांगुली पुढे म्हणाले की, ‘बीसीसीआय कसोटी क्रिकेटशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करण्यात येणार नाही. जर ही कसोटी वाया गेली या श्रेणीत ठेवली जाते तर इसीबीला या कसोटीचे ४ कोटी पौंड इंशुरन्स रक्कम म्हणून मिळेल. यामुळे त्यांना पाचवी कसोटी रद्द झाल्याने झालेले नुकसान भरुन निघेल असा दावा केला जात आहे.

रद्द कसोटीच्या बदल्यात दोन अतिरिक्त टी २० सामने?

दरम्यान, टीम इंडिया पुढच्या वर्षी जुलै महिन्यात मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. त्यावेळी या रद्द झालेल्या कसोटी सामन्याच्या बदल्यात संघ अधिकचे दोन टी २० सामने खेळण्याचा प्रस्ताव बीसीसीआय दिली आहे का असे गांगुलींना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी ‘आम्ही अतिरिक्त एकदिवसीय किंवा टी२० सामना खेळण्यास तयार आहोत. मात्र हा मुद्दा नाही. फक्त नंतर जो कसोटी सामना होणार आहे तो मालिकेतील पाचवा कसोटी सामना असणार आहे.’ असे उत्तर दिले.

आयसीसीला वाटले की सामन्याचे आयोजन कोरोनामुळे होऊ शकले नाही तर भारत ही कसोटी मालिका २ – १ ने जिंकेल. या प्रकारे जर सामना रद्द झाला तर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या कोरोना नियमांनुसार स्विकार्ह असेल. गांगुली पुढे म्हणाले की, ‘गेल्या १८ महिन्यात कोरोनामुळे मालिका रद्द करण्यालाच प्राथमिकता देण्यात आली आहे. बीसीसीआयने गेल्या वर्षी भारतात होणारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका रद्द केली होती. यात आम्हाला चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.’

गांगुली म्हणाले की भविष्यात संघात कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला तरी मालिका कशी सुरु ठेवता येईल याबाबत अभ्यास करण्यात येईल. कारण आम्हाला माहित आहे की प्रक्षक आणि टीव्हीवरील प्रक्षकांच्या दृष्टीकोणाने हे किती नुकसानदायक आहे. विशेष करुन ज्यावेळी मालिका रंगतदार स्थितीत असते त्यावेळी हे जास्तच नुकसानदायक असते. बीसीसीआयची कसोटी क्रिकेटलाच प्राथमिकता असणार आहे. असेही गांगुली म्हणाले.

सनी लिओनेचा धुमधडाक्यात गणेशोत्सव ( पाहा फोटोज् )

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button