माझे ट्विटर अकाऊंट मला पुन्हा मिळू शकते | पुढारी

माझे ट्विटर अकाऊंट मला पुन्हा मिळू शकते

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या ट्विटर अकाऊंटमुळे चर्चेत आली आहे. मे 2021 मध्ये कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. ट्विटर कंपनीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याने तिच्यावर ही कारवाई झाली होती. अ‍ॅलन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह काही अधिकार्‍यांना पदावरून काढून टाकले. यानंतर कंगनाला तिचे अकाऊंट पुन्हा मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच कंगनाने तिचे ट्विटर अकाऊंटबद्दल स्पष्टपणे भाष्य केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या खास शैलीत उत्तरे दिली. मी ट्विटरवर एक वर्षासाठी होते, पण एक वर्षही ट्विटर मला सहन करू शकले नाही. बघा विचार करा. काही लोक दहा वर्षे ट्विटरवर सक्रिय आहेत. त्यानंतर मी इन्स्टाग्रामवर सक्रिय झाले, पण त्यावरही मला तीन वेळा नोटीस आली आहे. त्यानंतर मात्र मी स्वत: इन्स्टाग्राम वापरतच नाही. माझी टीम त्या सर्व गोष्टी पाहते आणि जेव्हापासून माझ्या टीमने इन्स्टाग्राम चालवणे सुरू केले, तेव्हापासून कोणाला काहीही तक्रार नाही. सर्व काही ठीक चालले आहे.

Back to top button