माशासारखा कपडे घातलेल्या प्रियांका चोप्राच्या ड्रेसचं उघडलं बटण आणि…

माशासारखा कपडे घातलेल्या प्रियांका चोप्राच्या ड्रेसचं उघडलं बटण आणि…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या जोडीला दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची कॉपी म्हटलं जात आहे. कारण, जसे रणवीर सिंह दीपिकाची काळजी घेतो. त्याचप्रमाणे निकदेखील प्रियांका चोप्राची काळजी घेतो. याचाच प्रत्यय एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी आला.

प्रेम असो वा एकमेकांना समजून घेणे असेल. प्रत्येक वेळी हेल्दी आणि हॅपी रिलेशनशिपची झलक यांच्यात पाहायला मिळते. एका इव्हेंटमध्ये देसी गर्लला इम्बेरसिंग मोमेंट होताना निक जोनसने तिला वाचवलं. कोणताही संकोच न करता निकने तिचा ड्रेस व्यवस्थित केला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

काय घडलं त्यावेळी?

हे स्टार कपल स्टायलिश अंदाजात कान फिल्म फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये सहभागी झाले. फॅशन लव्हर पीसी नेहमीप्रमाणे स्टनिंग दिसत होती.

तिच्यासाठी स्टायलिस्टने इटलीच्या लक्झरी लेबल Fendi कडून लव्हेंडर कलरचा डिझायनर ड्रेस मागवला होता.

माशासारखा ड्रेस

या ड्रेसच्या आउटफिट सुंदर होते. हायनेक ड्रेसमध्ये चेस्ट पोर्शनवर बटन्स होत. ड्रेसचा फिश स्केल डिझाईन होता.

या आऊटफिटमुळे ती एकदम हटके लुकमध्ये दिसत होती.

अन्‌ समोरचं उघडलं बटण

स्क्रीनिंगमध्ये जाण्यासाठी प्रिकनिक आपल्या फॅन्ससोबत फोटो क्लिक करताना स्पॉट झाले. यावेळी अचानक तिच्या ड्रेसचे एक बटण उघडले. निकने पाहिल्यानंतर पटकन मदतीसाठी तो पुढे सरसावला. आजूबाजूच्या कॅमेऱ्याची चिंता न करता त्याने पीसीच्या ड्रेसचे बटन लावले. हा प्रकार कॅमेऱ्याद कैद जाला. सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. या कपलचे कौतुक होऊ लागले. नेटकरी निकला जेंटलमॅन म्हणू लागले.

त्यावेळी निकने ड्रेस ठीक केला

असाचं एक प्रसंग त्यांच्याबद्दलही पाहायला मिळाला होता. जेव्हा चोप्रा एका ॲवॉर्ड शो होस्टिंगमध्ये निकसोबत गेली होती. बिलबोर्ड म्युझिक ॲवॉर्ड्ससाठी पीसीने स्टनिंग न्यूड शेड ड्रेस घातला होता. Dolce & Gabbana फॅशन हाऊसने तिच्यासाठी हा ड्रेस रेडी केला होता.

जेव्हा मीडियासाठी फोटो काढत होते. तेव्हा निक तिच्याजवळ गेला. तेव्हा चुकून त्याने तिच्या ड्रेसवर पाय ठेवला. तेव्हा पटकन त्याने पाय हटवला आणि खाली वाकून तिचा ड्रेस सरळ केला.

हेही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news