अभिनेत्री केतकी चितळेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अभिनेत्री केतकी चितळेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या वक्त्यव्यामुळे कायमच चर्चेत असते. अशाच एका वक्तव्यामुळे केतकी चर्चेत आली होती. त्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र अभिनेत्री केतकीचा ठाणे जिल्हा कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

अभिनेत्री केतकी चितळे हिने नवबौद्ध हे ६ डिसेंबरला फुकट मुंबईला येतात तो धर्मविकासाचा हक्क आहे अशा पद्धतीची टीका तीने केली होती. हा मजकूर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता.

आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वकील स्वप्नील जगताप यांच्या तक्रारीनंतर केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आधी सुद्धा केतकीने अशीच खळबळजनक वक्तव्य केली आहेत . मात्र या वक्तव्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली असून ९ डिसेंबर रोजी ठाणे जिल्हा न्यायालयाने अटक पूर्व जमीन अर्ज फेटाळला आहे.

"महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ६ डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नसून ते मुंबई दर्शनासाठी येतात. या केतकीच्या वक्तव्यावर आक्षेप घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीच्या वक्तव्यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून तिच्यावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

logo
Pudhari News
pudhari.news