मन उडू उडू झालं : ‘तलाश’ सिनेमाच्या ‘या’ अभिनेत्रीची होतेय चर्चा

मन उडू उडू झालं : ‘तलाश’ सिनेमाच्या ‘या’ अभिनेत्रीची होतेय चर्चा
Published on: 
Updated on: 

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ग्लॅमरस अंदाज हा नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालतो. एखादी व्यक्ती नेहमी ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमध्ये दिसली की तिची छबी तयार होते. पण, तिचं व्यक्ती जर सिंपल आणि सोबर लूकमध्ये दिसली तर तितकाच निरागसपणा किंवा सिंम्पलिसिटी त्या व्यक्तीमध्ये दिसून येते. त्यामुळे प्रेक्षकांवर त्याची जास्त भुरळ पडते. असंच काहीसं आहे. अभिनेत्री रीना मधुकर उर्फ रीना अगरवाल हिच्या बाबतीत. रीना मधुकर ही मन उडू उडू या मालिकेत काम करणार आहे. सध्या तिची जोरदार चर्चा होताना दिसतेय.

रीनाने आतापर्यंत तिचा सोशल मीडिया प्रेझेन्स अतिशय ग्लॅमरस ठेवला आहे. जो तिच्या चाहत्यांनाही आवडतोय. पण, अभिनय आणि कामाच्या बाबतीत तिने नेहमीच वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत. जसे की 'अजिंठा' या मराठी सिनेमात तिने आदिवासी पात्र साकारले हाेते.

'एजंट राघव- क्राईम ब्रांच' हिंदी टेलिव्हिजन शोमध्ये फॉरेंन्सिक डॉक्टरच्या भूमिकेत दिसली. इतकेच नव्हे तर 'तलाश' हिंदी सिनेमात पोलिसाचं पात्रं साकारलं. '३१ दिवस' या मराठी सिनेमात अंध मुलीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली. थोडक्यात काय तर, रीनाने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत नाविन्य होतं.

आता रीना झी मराठीवरील मंदार देवस्थळी दिग्दर्शित 'मन उडू उडू झालं' मालिकेत दिसणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे.

या मालिकेत ती 'सानिका देशपांडे'ची भूमिका साकारत आहे. जी नायिका साकारत असेल्या हृता दुर्गुळेची ऑनस्क्रीन बहिण दाखवली आहे.

मन उडू उडू झालं ही पहिली मराठी मालिका

'मन उडू उडू झालं' ही रीनाची पहिली मराठी मालिका आहे. याविषयी व्यक्त होताना रीना म्हणते की, "'मन उडू उडू झालं' ही माझी पहिली मराठी मालिका आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की, मी माझ्या मायेच्या, हक्काच्या घरी परत आली आहे.

फक्त माझ्याच नव्हे तर मी जगभरातील सर्व मराठी प्रेक्षकांच्या घरी आली आहे. ज्यांना मी आठवड्यातले सलग ६ दिवस भेटणार आहे. त्यांच्याच घरातला एक भाग बनणार आहे.

तसेच या मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची छान संधी या निमित्ताने मला मिळाली. हृता दुर्गुळेचं काम मी पाहिलं होतं. आणि मला आवडलेलं.

हृतासोबत आणि इतर कलाकारांसोबत काम करताना मजा येतेय. झी मराठी वाहिनी ही देखील माझ्यासाठी खास संधी आहे. कारण या वाहिनीशी प्रत्येक मराठी कुटुंब जोडलं गेलं आहे.

तसेच सेटवरील वातावरण अगदी हलकं-फुलकं, प्रसन्न आहे. असं वाटतंय जणू वर्क फ्रॉम होमचं चालू आहे. इतक्या छान पद्धतीने सेटवर सर्वांचा वावर असतो."

यापूर्वी रीनाने मराठी सिनेमांत काम केले आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीमध्ये देखील रीनाने तिची स्वत:ची ओळख तयार केली आहे. त्यामुळे तिच्या या पहिल्या मराठी मालिकेला मराठी कलाकारांसह हिंदी कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या.

ग्लॅमरस रीनाचा ऑनस्क्रिन नवा लूक आणि नवी भूमिका प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ट्रिट ठरणार हे नक्की.

हेदेखील वाचलं का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news