माझी तुझी रेशीमगाठ : प्रार्थना-श्रेयस यांची गणेशोत्सव विशेष भागात एन्ट्री | पुढारी

माझी तुझी रेशीमगाठ : प्रार्थना-श्रेयस यांची गणेशोत्सव विशेष भागात एन्ट्री

मुंबई; पुढारी ऑनलाईन : झी मराठीने ‘नव्या नात्यांच्या बांधू गाठी’ असं म्हणत ऑगस्ट महिन्यात नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केल्या. या सर्व मालिकांना प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. प्रार्थना-श्रेयस यांची गणेशोत्सव विशेष भागात एन्ट्री होणार आहे. प्रार्थना-श्रेयस-मायरा या तिघांची एन्ट्री स्पेशल ठरणार आहे.

Nora Fatehi : नोराचा कंबर हलवणारा व्हिडिओ पाहून डोळे मोठे करू नका

अक्षय कुमार-सोनाक्षी सिन्हा यांची ‘डबल एक्सएल’ची जोडी!

झी मराठी म्हणजे मराठी संस्कृती आणि परंपरांचा आरसा आणि सध्या सगळीकडे श्रींच्या आगमनाची लगबग चालू आहे त्यात झी मराठी देखील यंदाचा गणेशोत्सव प्रेक्षकांसाठी खास बनवण्यासाठी विशेष सादरीकरण करणार आहे. या विशेष सादरीकरणांनी ही वाहिनी प्रेक्षकांसोबत नव्या नात्यांचा श्रीगणेशा करतेय.

कार्तिक आर्यनकडे अनेक ऑफर्स

आलिया भट्ट या अभिनेत्रीचा डार्लिंग्ज चित्रपट पूर्ण

प्रेक्षकांचा लाडक्या ‘वेध भविष्याचा’ या कार्यक्रमात गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. आदेश बांदेकर, स्वप्नील जोशी, भाऊ कदम, निलेश साबळे, श्रेया बुगडे, अनिता दाते, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, उमेश जगताप हे कलाकार या कार्यक्रमात उपस्थित राहून गुरुजींसोबत गप्पा मारणार आहेत.

गुलजार-रेहमान एकत्र

वाढदिवस विशेष : विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता अतुल कुलकर्णी…

हे विशेष भाग १० सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीस येतील. तसेच ‘होम मिनिस्टर सोबत लिटिल चॅम्प्स’ गणेशोत्सव साजरा करणार आहेत. आदेश भावोजी या विशेष भागात सारेगमप लिटिल चॅम्प्स मधील स्पर्धकांच्या कुटुंबाला भेट देणार आहेत.

८ सप्टेंबर पासून प्रेक्षक हे विशेष भाग पाहू शकतील. महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये नुकतीच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ची टीम सज्ज होणार आहे.

गणेशोत्सव विशेष भाग साजरा करण्यासाठी बेहेरे, श्रेयस, मायरा तसंच या मालिकेतील कलाकार या मंचावर हजर होणार आहेत. ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत देखील गणरायाचा आगमन होणार आहे.

गणरायाच्या आगमनासोबतच दिपू आणि इंद्रा मध्ये मैत्रीच नातं खुलताना दिसेल. इकडे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मध्ये देखील गणपती बाप्पाच्या आगमनाने ओम आणि स्वीटू मधील दुरावा दूर होणार का हे देखील पाहणं औसुक्याचा ठरणार आहे.

याचसोबत झी मराठीच्या इतर मालिकांमध्ये देखील खूप जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे पाहायला विसरू नका ‘नव्या नात्यांच्या बांधू गाठी’ मी मराठी झी मराठी.

मोहित रैना याने सांगितला काश्मीरमध्ये वडिलांना आलेला अनुभव

सहा महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला केले जेरबंद

महाविकास आघाडी : त्रिपक्षांचे तारू नाराजीच्या खडकाकडे?

Back to top button