द़ृश्यम – 2 च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगवर 25 टक्के सूट | पुढारी

द़ृश्यम - 2 च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगवर 25 टक्के सूट

अभिनेता अजय देवगण सध्या चर्चेत आहे. त्याचा ‘थँक गॉड’ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो ठिकठिकाणी फिरत आहे. तसेच त्याचा आगामी ‘द़ृश्यम – 2’ देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. 2014 साली आलेल्या ‘द़ृश्यम’ चित्रपटाचा हा पुढील भाग असणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता एक नवी शक्कल लढवली आहे. निर्मात्यांनी 24 ऑक्टोबरपासून चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात केली आहे. ही ऑफर 24 आणि 25 तारखेपर्यंत आहे. बुकिंग तुम्ही कोणत्याही अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने करू शकता. ज्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होईल त्या दिवशी तुम्हाला तिकिटावर 25 टक्के सूट मिळणार आहे. अक्षय खन्नाही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नवीन पोलिस अधिकार्‍याचे पात्र तो साकारणार आहे. या चित्रपटाद्वारे मराठमोळा सिद्धार्थ बोडके बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

Back to top button