प्रेम म्हणजे काय असतं चित्रपट या दिवशी भेटीला | पुढारी

प्रेम म्हणजे काय असतं चित्रपट या दिवशी भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘प्रेम म्हणजे काय असतं’ हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तख्त प्रॉडक्शन यांनी प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटात सुरज नायकाच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे.

साताऱ्याच्या सुरजचे पदार्पण

सातारा जिल्ह्यातील सुरज माने ‘प्रेम म्हणजे काय असतं’ या चित्रपटातून पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या या तरुणानं चित्रपटात अभिनेता होण्यापर्यंतचा स्वप्नवत प्रवास साध्य केला आहे. साताऱ्याच्या जवळच एका खेड्यात राहणारा सुरज घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं तो पेट्रोल पंपावर काम करू लागला. सुरजच्या लहानपणीतच त्याच्या वडिलांचं निधन झालं. आई शेतमजुरी करते.

चित्रपटाची आवड आणि चित्रपटात काम करण्याविषयी सुरज म्हणाला, ‘चित्रपटांची लहानपणापासूनच आवड होती. अनेक चित्रपट पाहिले, नाटकांत, वेब मालिकांमध्ये काम केले. प्रेम म्हणजे काय असतं हा माझा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून मला खूप शिकायला मिळालं. आता अभिनयातच करिअर करायची इच्छा आहे. त्यामुळे आता पुढे जाण्यासाठी आणखी काम करण्याचा मानस आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button