Rana Daggubati : भल्लालदेवने सेल्फी काढणाऱ्या फॅनचा मोबाईल हिसकावला | पुढारी

Rana Daggubati : भल्लालदेवने सेल्फी काढणाऱ्या फॅनचा मोबाईल हिसकावला

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा अभिनेता राणा दग्गुबाती ( Rana Daggubati ) हा ‘बाहुबली’ चित्रपटातून प्रकाश झोतात आला. बाहुबली चित्रपटात त्याने ‘भल्लालदेव’ ची भूमिका साकारून चाहत्याच्या मनात घर केलं. राणा दग्गुबातीची एक झलक पाहण्यासाठी त्याचे लाखो चाहते वेडे झालेले असतात. परंतु, जर आवडत्या अभिनेत्याने जर झलक दाखवण्यास आणि फोटो काढण्यास मज्जाव केला तर चाहते खूपच नाराज होतात. अशीच एक घटना साऊथ स्टार्स राणा दग्गुबातीच्या बाबतीत घडली आहे. राणा दग्गुबतीला तिरुपतीला बालाजीच्या दर्शनाला गेल्यावर तेथील फॅन्सवर संतापले आहेत.

‘बाहुबली’ फेम अभिनेता राणा दग्गुबाती ( Rana Daggubati ) नुकतेच तिरुपतीच्या बालाजी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी त्याच्यासोबत पती मिहिका बजाज आणि वडील डी. सुरेश बाबू हे दर्शनासाठी आले होते. पहिल्यांदा मंदिर परिसरात राणा दग्गुबाती आल्यावर फॅन्सनी त्याची झलक पाहण्यासाठी घेराव घातला. यावेळी त्यांनी चाहत्यांना शांतपणे बाजूला होण्याची विनंती केली. या विनंतीला मान देवून चाहत्यांनी राणा दग्गुबातीला वाट काढून दिली. परंतु, यानंतर एका फॅन्स पुन्हा लांबून पळत येवून दग्गुबातीसोबत सेल्फी काढायला लागला.

याच दरम्यान आधी शांतपणे चाहत्यांना बाजूला होण्यास विनंती केली होती. परंतु पुन्हा हा चाहता मध्येच आल्याने त्याचा संताप झाला. राणाने यावेळी रागाने चक्क चाहत्याचा मोबाईल काढून घेतला आणि लगेच हसता-हसता परतही केला. यावेळी तो मंदिर परिसरात फोटो काढू नका असेही सांगत होता. हा चाहता काही ऐकत नसल्याने त्याला असे करावे लागले आहे. या घटनेची एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

‘बाहुबली’ फेम राणा दग्गुबाती शेवटचा ‘विराटपर्वम’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात तो अभिनेत्री साई पल्लवीसोबत रोमान्स करताना दिसला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला नाही. तर राणा दग्गुबातीचा आगामी ‘रे डोणवण’ या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button