मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल शिबानी दांडेकर हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. फरहान आणि शिबानी आपले प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या शिबानीने आपल्या ४१ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे निमित्ताने शिबानीने 'फरहान' नावाचा टॅटू गोंदवून घेतला आहे.
शिबानीने आपला वाढदिवस साजरा करत त्याचे काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. तिने बॉयफ्रेंड फरहान अख्तर यांच्या नावाचा 'फरहान' असा टॅटू मानेवर गोंदवून घेतला आहे. यासोबतच शिबानी स्वत: च्या हातावर आणखी एक टॅटू बनविताना दिसत आहे.
फरहान आणि शिबानी दांडेकर दोघेही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. शिबानीने सोशल मीडियावर नेहमी बोल्ड लूक पाहायला मिळतो. शिबानीचा हा टॅटू काढलेला फोटो सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.
शिबानी आणि फरहान हे गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही अनेक ठिकाणी स्पॉट झाले आहेत. एवढेच नाही तर दोघाची एकत्रित फोटोदेखील पाहायला मिळाले आहेत.
फरहान अख्तर यांनी २००० मध्ये अधुना भबानीशी लग्न केले होते. यानंतर काही कारणास्तव २०१७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांना दोन मुली आहेत.
शिबानी दांडेकर 'खतरों के खिलाडी' आणि 'झलक दिखला जा' या शोमध्ये दिसली होती. फरहान अख्तर 'तुफान' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला. याशिवाय फरहान आगामी आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफसोबत आगामी 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचलंत का?