bhagyashree : भाग्यश्रीच्या सौंदर्यापुढे नव्या अभिनेत्री पडल्या फिक्या (Video)
मुंबई; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री भाग्यश्री (bhagyashree) हिचे नाव घेतले की बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट 'मैंने प्यार किया'ची आठवण येते. गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर राहिलेली भाग्यश्री (bhagyashree) पुन्हा एकदा कंगना रनौतच्या 'थलाइवी'मधून कमबॅक करत आहे.
५२ वर्षाच्या भाग्यश्रीचे आजही सौंदर्य एखाद्या तरुण अभिनेत्रीप्रमाणे आहे. फिट राहण्यासाठी भाग्यश्री जीममध्ये प्रचंड मेहनत घेते. भाग्यश्रीने वर्कआउटचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओत ती स्ट्रेचिंग एक्सरसाइज करताना दिसून येत आहे. याआधीही तिने वर्कआउटचे अनेक व्हिडिओज शेअर केले आहेत. ते पाहिल्यावर ती आपल्या फिटनेसबाबत जागरुक असल्याचे दिसते.
हल्लीच भाग्यश्रीने मोनोकिनीमधील आपले काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. त्यात ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत होती.
भाग्यश्री सोबत काम करायला मिळाल्याने खूश असल्याचे कंगनाने म्हटले आहे. कंगनाने एका इंग्रजी वेबसाइटशी बोलताना म्हटले आहे की, मी जेव्हा भाग्यश्रीना भेटले तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न होते. आम्ही त्यांचे बॉलिवूडमधील दमदार प्रदर्शन पाहिले. मात्र, त्यांनी थोड्या कालावधीतच इंडस्ट्रीला रामराम केला. आता त्यांनी कमबॅक केले आहे.
कमबॅक करताना त्यांनी मला काही मनोरंजक गोष्टी सांगितल्या. त्या चांगल्या गोष्टीसाठी नेहमी तयार असतात. भाग्यश्री माझी आवडती अभिनेत्री आहे. आणि त्यांच्यासोबत काम करत आहे. त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते.