

पुढारी ऑनलाईन डेस्क : मतदान करायचे असेल आणि कुठे ओळख सिद्ध करायची असेल तर मतदान ओळखपत्र महत्त्वाचे असते, मात्र त्यात बदल करायचा कसा? सरकारकडून आलेल्या ओळखपत्रात अनेक चुका असतात. अशा वेळी या चुका दुरुस्त करायच्या यांची अनेकांचा चिंता असते. चला तर मग जाणून घेऊ.
मतदान ओळखपत्र हा महत्त्वाचा सरकारी दस्ताऐवज आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून ही ओळखपत्रे दिली जातात.
मतदान करायला गेल्यानंतर आपली ओळख सिद्ध करण्यासाठी हे ओळखपत्र महत्त्वाचे असते.
जर ओळखपत्र नसेल तर आपल्याला अडचणीचा सामना करावा लागतो.
शिवाय आपल्याला पासपोर्ट काढण्यासाडीही मतदान ओळखपत्राची गरज असते.
ओळख, जन्म तारीख पुरावा, पत्ता यासाठी हा दस्ताऐवज महत्त्वाचा असतो.
मात्र सरकारी यंत्रणा अनेकदा त्रुटी असलेले कार्ड मतदारांना देते आणि अनेक अडचणींचा समाना सुरू होतो.
यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात. मात्र, आता जर तुमच्या ओळखपत्रात काही अडचणी असतील तर त्या दुरुस्तही करता येतात. मतदान ओळखपत्र या महत्त्वाच्या दस्ताऐवजात कसा बदल करायचा याबाबत पाहून घेऊ.
हेही वाचा: